'मोदींनाच निवडून द्या, नाहीतर दहशतवादी करतील संसदेवर हल्ला'

'मोदींनाच निवडून द्या, नाहीतर दहशतवादी करतील संसदेवर हल्ला'

सर्मांच्या या वक्तव्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. मतं मिळविण्यासाठी भाजप हल्ल्याचं राजकारण करतेय असा आरोप होतोय.

  • Share this:

गुवाहाटी 3 मार्च  : भारताच्या हवाई दलाने बालाकोट इथल्या दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्याचं आता राजकारण सुरू झालंय. विरोधक पुरावा मागत आहेत तर भाजपकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला जातोय. भाजपचे आसामचे मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांच्या वक्तव्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.

आसाममधल्या कामपूर इथं बोलताना सर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनाच  जिंकून द्या. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर पाकिस्तानचं लष्कर आणि दहशतवादी पुन्हा भारताच्या संसदेवर हल्ला करतील. एवढच नाही तर ते दहशतवादी आसामच्याही संसदेवर हल्ला करण्याची शक्यता आहे.

सर्मांच्या या वक्तव्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. मतं मिळविण्यासाठी भाजप हल्ल्याचं राजकारण करतेय असा आरोप होतोय. तर विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मोदींचा अमेठीत हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर शाब्दिक वार करत म्हटलं की, काही लोक येता-जाता मेड इन उज्जैन, मेड इन जयपूर, मेड इन इंदूरसंदर्भात भाषण देत फिरत आहेत. पण हा मोदी आहे ज्याने 'मेड इन अमेठी' चे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

अमेठीमध्ये अत्याधुनिक एके-203 रायफलची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी रविवारी (3मार्च)केली. येथे  रायफलच्या निर्मिती प्रकल्पाचे तसंच विविध विकासकामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना 'मेड इन अमेठी' मुद्यावर राहुल गांधींना सणसणीत टोला हाणला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''अत्याधुनिक रायफल एके-203 रायफलची अमेठीत निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प 8-9 वर्षापूर्वीच सुरू होणं अपेक्षित होते. अत्याधुनिक रायफल बनवण्यासाठी कोरबामध्ये कारखान्याची स्थापना करण्यात आली होती, पण त्याचा पुरेपूर वापर करण्यात आला नाही. प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन तीन वर्ष लोटली, पण येथे कोणत्या शस्त्राची निर्मिती केली जाईल?, याबाबत पूर्वीचे सरकार ठोस निर्णय घेऊ शकले नाही''.

'अमेठीतील युवा पिढीचा विश्वासघात'

''1500 लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी (काँग्रेस )दिले होते. पण अमेठीतील लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली. अमेठीतील युवा पिढीचा विश्वासघात करणारे जगभरात रोजगारासंबंधीची भाषण देत फिरत आहेत'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढवला.

First published: March 3, 2019, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading