'मोदी काय करणार हे पवारांना माहीत नसतं, मग इम्रान खानला कसं कळणार'

महाराष्ट्र पाठोपाठ मोदींनी घरच्या मैदानातून देखील पवारांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 03:51 PM IST

'मोदी काय करणार हे पवारांना माहीत नसतं, मग इम्रान खानला कसं कळणार'

अहमदाबाद, 21 एप्रिल: मोदी पुढचे पाऊल कोणते उचलणार हे शरद पवारांना माहीत नसेल, तर मग पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कसे काय माहिती असेल की मोदी पुढे काय करणार, अशा शब्दात पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर हल्ला चढवला. विशेष म्हणजे मोदी गुजरातमधील एका सभेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील सर्व सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींच्या या टीकेला पवारांनी देखील उत्तर दिले. पण अद्याप निवडणुकीचे पाच टप्पे शिल्लक आहेत. त्यातील राज्यातील दोन टप्प्यांसाठी मतदान अद्याप झालेले नाही. राज्यात काँग्रेस पक्ष व नेत्यांना सोडून पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबातील वाद याच्यावरच भर दिला होता. मोदींची पवारांवरील टीका हा देखील चर्चेचा विषय झाला होता. पण आता महाराष्ट्रातील नव्हे तर गुजरातमधील सभेत बोलताना मोदींनी पवारांवर टीका केल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. पाकिस्तानवर अचानक केलेल्या एअर स्टाईकचा संदर्भ देताना मोदींनी पवारांचा समाचार घेतला. ते उत्तर गुजरातमधील पाटण येथील सभेत बोलत होते.

शनिवारी बारामती येथील सभेत बोलताना पवार म्हणाले होते की, मोदी पुढे काय करतील या विचारानेच भीती वाटते. याचा संदर्भ घेत मोदींनी पवारांच्या आरोपाला उपहासात्मक टीकेने उत्तर दिले. महाराष्ट्र पाठोपाठ मोदींनी घरच्या मैदानातून देखील पवारांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

मोदींची गुजरातमधील हा तिसरा दौरा आहे. आतापर्यंत त्यांनी राज्यात 7 सभा घेतल्या आहेत. पाटण येथील सभेत बोलताना त्यांनी लोकांनी पुन्हा एकदा मोदी सरकार यासाठी मतदान करण्याचे ठरवल्याचा दावा केला. देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून गुजरातमधील लोकसभेच्या 26 जागांसाठी मतदान होणार आहे.


Loading...

VIDEO: 'आम्ही लाव रे म्हणालो तर...', मुख्यमंत्र्यांनी घेतला राज ठाकरेंचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...