गर्भधारणेनंतर मांसाहार, सेक्स, कुसंगत टाळा; केंद्र सरकारचा अजब सल्ला

गर्भधारणेनंतर मांसाहार, सेक्स, कुसंगत टाळा; केंद्र सरकारचा अजब सल्ला

  • Share this:

14 जून : मोदी सरकारच्या आयुष मंत्रालयाने गर्भवती महिलांना गर्भधारणेनंतर मांसाहार, सेक्स, कुसंगत टाळा, आध्यात्मिक विचार बाळगा आणि तुमच्या खोलीमध्ये सुंदर फोटो ठेवा, तुम्हाला नक्कीच सुदृढ अपत्यप्राप्ती होईल, असा अजब सल्ला दिला आहे. केंद्र सरकारच्या या सल्ल्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आयुष मंत्रालयातर्फे ‘माता आणि बाल संगोपन’ या विषयावरील पुस्तकात या सूचना आहेत. 2014 मध्ये आयुष मंत्रालया अंतर्गत योग आणि निसर्ग चिकित्सा संशोधन केंद्राने हे पुस्तक संपादित केलं होतं. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं प्रकाशन केलं. हे पुस्तक तीन वर्षांपूर्वी संपादित करण्यात आलं होतं. योगविद्येच्या आधारे गर्भवतींना उपयुक्त ठरणाऱ्या सूचनांचा संग्रह केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यानूसार, गर्भवती महिलेने मांस खाऊ नका, गर्भधारणा झाल्यावर शरीरसंबंध प्रस्थापित करू नका, चांगले विचार करा, वाईट संगत टाळा आणि तुमच्या घरातल्या हॉलमध्ये चांगली चित्रे लावा. या सगळ्या सूचना देशातल्या गरोदर स्त्रियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने केल्या आहेत. या सूचना पाळल्या तर तुम्ही एका छान, गुटगुटीत आणि गोंडस बाळाला जन्म देऊ शकाल, असाही जावईशोध सरकारच्या आयुष मंत्रालयाने लावला आहे. आपल्या देशातल्या जन्मदरांचा विचार करता दरवर्षी 2 कोटी 60 लाख मुले-मुली जन्म घेतात.

मात्र, या सगळ्या सूचनांवरून आता केंद्र सरकारवर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यांत अडकण्याची चिन्हं आहेत. कारण मध्यमवर्गीय किंवा दारिद्र्यरेषेखाली असलेल्या गर्भवती स्त्रियांनी हे निकष कसे पाळायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या सूचना आयुष मंत्रालयाने केल्या आहेत, त्यासाठी पैसे आणायचे कुठून? याचे उत्तर सरकारला द्यावे लागू शकते.

आयुष मंत्रालयाची 'संस्कारी गर्भवती'!

गर्भवतींनी मांसभक्षण करू नये

स्त्रियांनी गर्भवती असताना शारिरिक संबंध ठेवू नयेत

रागापासून दूर रहावं

लोभ, मत्सर, आसक्ती यासर्वांपासून दूर रहावं

गर्भवती असताना प्रभावशील व्यक्तींविषयी वाचन करावं

आध्यात्मिक विचार मनात बाळगावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2017 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading