BREAKING : नरेंद्र मोदींचा खळबळजनक दावा, तृणमूलचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात

BREAKING : नरेंद्र मोदींचा खळबळजनक दावा, तृणमूलचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खळबळजनक दावा केला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

  • Share this:

कोलकाता, 29 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खळबळजनक दावा केला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपलाच विजय मिळेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमधल्या सेरामपूरमधल्या एका सभेमध्ये मोदींनी हे जाहीर करून टाकलं. 23 मे च्या निकालाच्या दिवशी तुम्हाला सगळीकडे भाजपच दिसेल, असंही ते म्हणाले.

'तुमचे आमदार आमच्या कायम संपर्कात आहेत. तुम्हाला सोडून हे आमदार आमच्याकडे येतील', असा इशाराही त्यांनी ममता बॅनर्जींना दिला. तुम्ही तुमच्या लोकांचा विश्वासघात केल्यामुळे त्यांना आमच्यासोबत यायचं आहे. त्यामुळे आता ममता दीदी तुमच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत, असं नरेंद्र मोदी जाहीर सभेत म्हणाले.पश्चिम बंगालमध्ये 42 जागांसाठी सात टप्प्यात मतदान होतं आहे. या राज्यात मागच्या निवडणुकीत भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी मात्र पश्चिम बंगालमध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल, असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. त्याच वेळी ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. भाजपला इथे रसगुल्ला मिळेल, असं ममता उपहासाने म्हणाल्या होत्या.

आता मात्र नरेंद्र मोदी यांच्या दाव्यामुळे तृणमूल काँग्रेसला मोठं खिंडार पडणार, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

===================================================================

VIDEO: उमा भारतींची गळाभेट, साध्वी प्रज्ञा यांना कोसळलं रडू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या