EXCLUSIVE : लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचा प्लॅन तयार, 'ही' दोन राज्य टार्गेटवर

EXCLUSIVE : लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचा प्लॅन तयार, 'ही' दोन राज्य टार्गेटवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशभरात मॅरेथॉन प्रचारसभा घेण्यात येणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : लोकसभा निवडणुकीचं बिगुल काही दिवसांतच वाजण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही देशभरात मॅरेथॉन प्रचारसभा घेण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी देशभरात 100 पेक्षा जास्त सभा घेणार आहेत. भाजपची प्रचार समिती मोदींच्या याच सभांची रुपरेषा तयार करण्याच्या कामाला लागली आहे.

कसा असेल मोदींचा निवडणूक मास्टरप्लॅन?

नरेंद्र मोदी तीन लोकसभा मतदारसंघात मिळून एक मोठी सभा घेतील, असं भाजपच्या प्रचार समितीत सहभागी असलेल्या एका मोठ्या नेत्यानं सांगितलं आहे. प्रचारसभांशिवायच देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मोदींकडून रोड-शो करण्यात येईल, अशीही माहिती आहे.

कोणत्या दोन राज्यांवर असणार मोदींचा फोकस?

मागच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी यांची जादू मोठ्या प्रमाणात चालली होती. लोकसभेच्या 80 जागा असणारे हे राज्य निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मोदींचा याही निवडणुकीत युपीवर फोकस असणार आहे. उत्तर प्रदेशात मोदी तब्बल 25 प्रचारसभा घेणार आहेत.

उत्तर प्रदेशसोबत पश्चिम बंगालमध्येही मोदींकडून विशेष जोर लावण्यात येणार आहे. कारण 2014 मध्ये जी लाट होती ती लाट यावेळी नाही याची जाणीव आता भाजपलाही झाली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला 2014 मध्ये 70 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तेवढ्या जागा मिळण्याची यावेळी शक्यता नाही त्यामुळे नुकसान होणाऱ्या जागांची बेगमी इतर ठिकाणांवरून करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यात पश्चिम बंगाल हे राज्य महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदी प. बंगालमध्ये 15 प्रचारसभा घेतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींचा गड काबीज करण्यासाठी मोदींकडून जोरदार प्रयत्न होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला सत्ता मिळणार यावर विविध तर्क लढवले जात आहेत. अनेक सर्व्हेतून अंदाज व्यक्त केले जात आहेत. केंद्रात पुन्हा मोदींना संधी मिळेल की राहुल गांधी काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून देतील यावर अनेक जण मत व्यक्त करत आहेत. या दोन्ही शक्यताबरोबरच बिगर भाजप अथवा बिगर काँग्रेस आघाडी सरकार तयार करेल का हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

कोल्हापुरातील सलूनवाला असा करतोय अभिनंदनच्या शौर्याला सलाम, पाहा VIDEO

First published: March 4, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading