VIDEO : जपानमध्ये घुमले वंदे मातरम् आणि जय श्रीराम चे नारे

VIDEO : जपानमध्ये घुमले वंदे मातरम् आणि जय श्रीराम चे नारे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G-20 परिषदेसाठी जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांशी मोदींनी संवाद साधला. त्यांच्या भाषणाच्या वेळी सभागृहामध्ये वंदे मातरम आणि जय श्रीराम च्या घोषणा दुमदुमल्या.

  • Share this:

ओसाका (जपान), 27 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G-20 परिषदेसाठी जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. जपानमध्ये राहणाऱ्या भारतीयांशी मोदींनी संवाद साधला. त्यांच्या भाषणाच्या वेळी सभागृहामध्ये वंदे मातरम आणि जय श्रीराम च्या घोषणा दुमदुमल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 शिखर परिषदेसाठी जपानमध्ये ओसाकाला गेले आहेत. पंतप्रधान मोदी बुधवारी रात्री जपानच्या दौऱ्यासाठी निघाले आणि गुरुवारी ओसाकाला पोहोचले. त्यांच्या याच दौऱ्यात जपानमधल्या अनिवासी भारतीयांसोबत त्यांच्या संवादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

संसदेच्या सदस्यांच्या शपथविधी सोहळ्यातही वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यासाठीही पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे जय श्रीरामचे नारे देण्यात आले होते.

G-20 परिषद सुरू होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा केली.

बिहारमधून महाराष्ट्रात मुलांची तस्करी, RPFच्या कारवाईत धक्कादायक खुलासा

भारत आणि जपानमध्ये व्यापार, पर्यटन, संरक्षण या क्षेत्रांसोबत अन्य क्षेत्रांमध्येही भारत आणि जपानचं सहकार्य वाढवण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारत आणि जपान एकत्र काम करणार आहेत.याच भेटीत शिंझो आबे यांनी भारताच्या दौऱ्यावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचा हा भारत दौरा ऑक्टोबरमध्ये होऊ शकतो.

27 जून ते 29 जून या काळात होणाऱ्या G-20 परिषदेत मोदी फ्रान्स, जपान, इंडोनेशिया, अमेरिका आणि तुर्कस्थान यासह 10 देशांच्या प्रमुखांसोबत बातचीत करणार आहेत.

=============================================================================================

VIDEO : आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस - संभाजी राजे छत्रपती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या