'मोदींचे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणं निश्चित'

'मोदींचे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणं निश्चित'

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींमुळे 'या' दिग्गज नेत्याने काँग्रेसला केला होता राम-राम.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मार्च : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचा हात पकडणारे माजी परराष्ट्र मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम.कृष्णा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणं निश्चित आहे, असे विधान कृष्णा यांनी केले आहे.

एस. एम. कृष्णा पुढे असंही म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी मी स्वतःहून प्रचार करेन. जेणेकरून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यासाठी मदत होईल'.

राजकीय भूकंपाची शक्यता, विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार?

एस.एम.कृष्णा भाजपसाठी मोठं शस्त्र

लोकसभा निवडणूक 2019मध्ये एस.एम.कृष्णा कर्नाटकमध्ये भाजपसाठी मोठी भूमिका निभावू शकतात.  कृष्णा हे वोक्कालिगा समाजाचे दिग्गज नेते मानले जातात. कर्नाटकच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 8 टक्के वोक्कालिगा समाजाचा समावेश आहे. दरम्यान,  कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी पूर्वीपासूनच वोक्कालिगा समाजाचे दमदार नेते मानले जातात. त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान देवेगौडादेखील या समाजाचे मोठे नेते आहेत. अशातच या समाजाच्या मतांचे विभाजन करून ही व्होटबँक स्वतःकडे वळवण्यास भाजप यशस्वी ठरली, तर लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी हे मोठे यश ठरेल.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका सोडणार का? काय म्हणाले अमोल कोल्हे

'राहुल गांधींमुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी'

दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्ष सोडल्याचा गौप्यस्फोट एस एम कृष्णा यांनी रविवारी (10मार्च)केला. '10 वर्षांपूर्वी राहुल गांधी खासदार होते. पण त्यावेळेस त्यांनी पक्षात कोणत्याही पदाची जबाबदारी सांभाळली नव्हती. तरीही त्यांच्याकडून पक्षापासून ते सरकारपर्यंत अनेक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला जायचा', असा आरोपही कृष्णा यांनी राहुल यांच्यावर केला आहे.

SPECIAL REPORT : गेल्या 27 वर्षांपासून काय आहे शरद पवार आणि विखे पाटलांमध्ये राजकीय संघर्ष?

First published: March 12, 2019, 8:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading