'मोदीजी, तुमचे फक्त 100 दिवस बाकी; उलटगणती सुरू आहे'

'मोदीजी, तुमचे फक्त 100 दिवस बाकी; उलटगणती सुरू आहे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवीन वर्षातली पहिलीच मोठी मुलाखत प्रसारित झाल्याबरोबर काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद घेतली. त्यात काँग्रेसने 10 प्रतिप्रश्न विचारले. या मुलाखतीवर विरोधकांनी घेतलेले मुख्य आक्षेप कोणते?

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जानेवारी : पंतप्रधानांचे शेवटचे 100 दिवस बाकी आहेत आणि उलटगणती सुरू झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेसतर्फे नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवीन वर्षातली पहिलीच मोठी मुलाखत प्रसारित झाल्याबरोबर काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद घेतली.

नरेंद्र मोदींची मुलाखत म्हणजे एकतर्फी संवाद होता. त्यातून काहीही  वेगळी माहिती हाती लागलेली नाही. त्यापेक्षा जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना उत्तरं दिली असतीत, तर बरं झालं असतं, अशी टीका या मुलाखतीनंतर काँग्रेसने केली. एवढी मोठी मुलाखत दिली, पण यातून जनतेच्या  10 प्रश्नांची उत्तरं मात्र दिली नाहीत, असा सूर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी लावला.

काँग्रेसचे आरोप आणि आक्षेप

  • सामान्यांना त्रास देणारी नोटबंदी करून काय साधलं?  काळ्या पैशातला एक रुपयासुद्धा परत आलेला नाही.

    दोन कोटी रोजगार दरवर्षी येणार असं आश्वासन मोदींनी दिलं होतं,  त्यातले ९ लाख पण आले नाहीत.

  • नोटबंदी हा झटका नव्हता असं मोदी म्हणतात, पण यामुळे रातोरात लोकांचे पैसे काळ्याचे पांढरे करून दिले.
  • शेतकऱ्यांना मोठा नफा देणारं धोरण आखू असं मोदी म्हणाले होते. नफा तर दूर पण शेतकऱ्यांना दिलासासुद्धा मिळालेला नाही, उलट कर्ज वाढत आहे.
  • उद्योगपूरक धोरण आखणार आणि व्यापाऱ्यांना पूरक सुटसुटीत धोरण आखणार असं पंतप्रधान म्हणाले होते. पण त्याऐवजी GST सारखा गब्बरसिंग टॅक्स लावून व्यापार चौपट केला.

राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ का?

मोदींनी आपल्या मुलाखतीत सर्जिकल स्ट्राईकबद्दल काही वक्तव्यं केली. त्यावर आक्षेप घेत रणदीपसिंग यांनी लोकांच्या जीवाशी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ का केला असा सवाल पंतप्रधानांना केला आहे.  काश्मीर खोऱ्यात 428 सैनिक आणि 278 सर्वसामान्य नागरिकांचा जीव गेला. लक्षलग्रस्त भागात 248 सुरक्षा कर्मचारी आणि 378 नागरिकांना जीव गमवावा लागला. याची जबाबदारी कोणाची, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. लोकांच्या जीवाशी सरकार का खेळतंय असंही काँग्रेसतर्फे सुरजेवाला यांनी विचारलं.

नरेंद्र मोदींनी मुलाखतीत उल्लेख केला तो नोटांच्या गादीवर झोपणारा सरकारी बाबू कोण?

मोदी सरकारचं आणखी एक गिफ्ट, पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीमागे मिळणार बक्कळ पैसा

...मग चौकशीची भीता का?

"देशातून भ्रष्टाचार हद्दपार करू, असं पंतप्रधान म्हणतात, पण गेल्या चार वर्षांत भ्रष्टाचारानं डोकं वर काढलंय. ३० हजार कोटींहून अधिक मोठा राफेल घोटाळा या सरकारच्या काळात झाला. हा घोटाळा नाही, असं मोदी म्हणतात तर मग जाँइंट पार्लमेंटरी कमिटीची चौकशी का टाळतात", असा सवालही त्यांनी विचारला.

गंगा साफ झाली का?

'गंगा स्वच्छ करण्याचं मोठं अभियान मोदींनी सुरू केलं. त्यासाठी मोठ्या रकमेची तरतूदही केली. प्रत्यक्षात गंगा साफ झाली का? सरकारनेच केंद्रीय प्रदूषण मंडळाचे आकडे पाहावेत. त्यांच्या अहवालानुसार गंगेच्या 39 पैकी 38 घाटांवर गंगा घाणच आहे', असा तपशीलही सुरजेवाला यांनी दिला.

काँग्रेसचे सवाल

स्मार्ट सिटी किती झाल्या? स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया या घोषणांचा मोठा गवगवा झाला. पण आता मोदी या घोषणांचं नाव घेणंसुद्धा बंद केलं आहे. विकास झाला तो कुठे आहे? कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा विकास दर सगळ्यांत कमी केवळ 0.5 टक्के इतका आहे. 15 लाख रुपये जनतेच्या खात्यावर जमा होतील, असं आश्वासन सरकारने दिलं होतं. ते कधी येणार याचं उत्तर मोदींनी दिलं तर बरं होईल, अशा शब्दांत काँग्रेसतर्फे मोदींच्या मुलाखतीवर प्रतिप्रश्न करण्यात आले.

First published: January 1, 2019, 8:11 PM IST

ताज्या बातम्या