नरेंद्र मोदींनी मुलाखतीत उल्लेख केला तो नोटांच्या गादीवर झोपणारा सरकारी बाबू कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019च्या सुरुवातीलाच ANI ला प्रदीर्घ मुलाखत दिली. काळ्या पैशाविषयी बोलताना त्यांनी सरकारी बाबू नोटांच्या गादीवर झोपायचे असा उल्लेख केला. हाच तो क्लार्क ज्याचा उल्लेख मोदींनी आपल्या नव्या वर्षातल्या पहिल्याच मुलाखतीत केला. याच्या गादीखाली मिळाले होते इतके रुपये..

  • Share this:

एका कलेक्टर ऑफिसमधल्या क्लार्कची ही गोष्ट 4 वर्षांपूर्वी उघड झाली होती. हा क्लार्क साधा नव्हता, नोटांच्या गादीवर झोपणाऱ्या या क्लार्कची झोप उडवली होती पोलिसांच्या छाप्यांनी.

त्याची झोपच नाही, तर गोवा प्लॅनसुद्धा या छाप्यांमुळे बिघडला. हाच तो क्लार्क ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या वर्षातल्या पहिल्याच मुलाखतीत केला.

डिसेंबर 2015ची ही गोष्ट. प्रदेशातल्या नीमच जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून असणाऱ्या नरेंद्र गंगवाल यांच्या घरावर उज्जैन लोकायुक्त पोलिसांनी अचानक छापे घातले होते.

या छाप्यांमध्ये क्लार्कच्या घरात करोडोंची रोख रक्कम सापडली. कोट्यवधी रुपयांच्या नोटा या क्लार्कच्या घरात होत्या. मध्य प्रदेशातल्या नीमच आणि मंदसौरमधल्या गंगवालच्या घरात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, जडजवाहिरे आणि जमीन व्यवहारांची कागदपत्रं सापडली.

नरेंद्र गंगवालच्या गादीखाली दडवल्या होत्या तब्बल 7 लाख रुपयांच्या नोटा. त्या बघून छापे घालणारे तपास अधिकारीसुद्धा अचंबित झाले.

याशिवाय गंगवालच्या घरातून 20 विदेशी घड्याळं, 1 बाईक, 1 स्कुटी आणि 5.58 लाखांचं घरगुती सामान जप्त करण्यात आलं.

नीमच जिल्ह्यात या क्लार्कचे 4 प्लॉट, एक घर, एक कार, तीन किलो चांदी आणि पाव किलो सोनं मिळालं.

शिवाय या गंगवाल क्लार्कच्या बँक लॉकरमधून 6 लाखांची LIC मधली गुंतवणूक, 150 ग्रॅम सोनं, 823 ग्रॅम चांदी, 8000 रुपये कॅश मिळाले.

हे छापे घातले तेव्हा नरेंद्र गंगवाल गोव्यात कुटुंबीयांसह सुट्टी साजरी करण्यासाठी निघाला होता.

काळ्या पैशावर वचक बसण्यासाठी नोटाबंदी केली, असं म्हणणाऱ्या मोदी सरकारने नव्या वर्षांत साफ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मात्र एक चांगली योजना आणली आहे. त्याविषयी खाली पाहा...

मोदी सरकारने पोस्ट ऑफिसच्या बचन योजनांवर व्याज वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पोस्ट ऑफिसमधल्या बचतीचे व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढवले आहे. एका वर्षाच्या बचत व्याजदरावर 0.10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता बचत केल्याने तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे.

टाइम डिपॉजिट (टीडी) किंवा फिक्स्ड डिपॉजिट (एफडी)- पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉजिटमध्ये, ठराविक कालावधीसाठी एकरकमी पैसे गुंतवले जाऊ शकतात. त्यात निश्चत रिटर्न आणि व्याज देयकेचा लाभ घेऊ शकता.

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉजिट (टीडी)किंवा फिक्स्ड डिपॉजिट (एफडी)मध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी व्याजदर वाढवण्यात येणार आहे.

भारतीय टपालखात्याच्या अधिकृत वेबसाईटनुसार, 5 वर्षांसाठी पैशांची बचत केली तर आयकर अधिनियम, 1961नुसार कलम 80 च्या अंतर्गत करावर सुट मिळणार आहे.

पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF)- पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतरही त्याचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.

पोस्टाची वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)- वरिष्ठ नागरिकांसाठी एक यशस्वी आयुष्य घालवण्यासाठी पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन सेविंग स्कीम (SCSS) योजना आमलात आणणार आहे.

 पोस्टाची राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी)- भारतीय टपालाकडून राबवली जाणारी गुंतवणूक योजना खूप प्रसिद्ध आहे. यात गुंतवणूक केल्यानंतर 8 टक्के व्याजदर मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या