नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? काय वाटतं लोकांना!

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? काय वाटतं लोकांना!

41 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता आता सर्वच राजकीय पक्ष प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाजपच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन केलं आहे. तर, राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास राफेल प्रकरणामध्ये चौकीदाराला जेलमध्ये टाकणार असल्याचं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आता आरोप-प्रत्यारोपांची राळ उठताना दिसत आहे. दरम्यान, लोकसभेत एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील. पण, बहुमतापासून त्यांना लांब रहावे लागेल असा निष्कर्ष यापूर्वी सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर आता पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती कुणाला? याबाबत देखील सर्व्हे करण्यात आला आहे. लोकनिती-सीएसडीएसनं हा सर्व्हे केला असून त्यामध्ये नरेंद्र मोदी यांना 41 टक्के पसंती मिळाली आहे. त्यामुळे मोदींची लोकप्रियता अद्याप देखील कायम असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे. तर, 28 टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या पारड्यात मतं टाकली आहेत.

कोणता मुद्दा महत्त्वाचा?

या सर्व्हेमध्ये 33 टक्के लोकांनी विकास, 25 टक्के लोकांनी महागाईच्या मुद्यांवर मतदान करणार असल्याचं म्हटलं. तर, केवळ 3 टक्के लोकांनी राफेल करार आणि राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

राफेल कराराबद्दल लोकांना काय वाटतं?

सध्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल करारावरून नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना दिसत आहेत. लोकांना देखील यावर विचारले असता 41 टक्के लोकांनी राफेल करारामध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हटलं आहे. तर, 37 टक्के लोकांनी मात्र नकार दिला. दरम्यान, देशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहेत. त्यावेळी देशातील राजकीय स्थिती स्पष्ट होईल.

SPECIAL REPORT: खासदार विनायक राऊत म्हणतात, '4 वर्षातील चुका पदरात घ्या'

First published: April 5, 2019, 11:55 AM IST

ताज्या बातम्या