News18RisingIndia : 'भारताच्या नवनिर्माणासाठी कटिबद्ध'

News18RisingIndia : 'भारताच्या नवनिर्माणासाठी कटिबद्ध'

पूर्वीच्या सरकारच्या काळात ज्या गोष्टी कमी व्हायला हव्यात त्या वाढत होत्या आणि ज्या वाढायला हव्या त्या कमी होत होत्या, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांवरच तोफ डागली.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : राजकारणापेक्षा राष्ट्रनीतीला महत्त्व दिलं तर त्याचे परिणाम चांगले होतात, पूर्वीच्या सरकारच्या काळात ज्या गोष्टी कमी व्हायला हव्यात त्या वाढत होत्या आणि ज्या वाढायला हव्या त्या कमी होत होत्या, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांवरच तोफ डागली. मोदी म्हणाले, "महागाई वाढत होती आणि विकास कमी होत होती. किती वेळा ही हेडलाईन लावली असेल? महागाई 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली होती ती आता 2 ते 4 टक्क्यांवर आली आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या परिषदेत ते बोलत होते.

वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे तज्ज्ञ, नेते, कलाकार यांना एका मंचावर आणून देशाच्या विकासावर चर्चा घडवून आणायचं काम न्यूज18 नेटवर्क करत आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात पंतप्रधानांनी संवाद साधला.

मागच्या वर्षांत काय झालं, आधी काय होतं, हे मी सांगणार आहे, असं सांगत मोदींनी सुरुवात केली. "देशात व्यापारविषयी चांगलं धोरण आणलं. त्यामुळे Ease of doing Business चं भारताचं रँकिंग उंचावलं. 142 वरून 77 वर आलं." सिस्टीम स्मूथ आणि पारदर्शी होते आहे, हे गेल्या काही वर्षांत होतं आहे, असं ते म्हणाले.

आधारमुळे विरोधकांची पोटदुखी का वाढली?

"जनधन योजनेची अनेकांनी थट्टा केली. बातम्यांमध्येही यावर टीका झाली. गरिबांसाठी बँकखातं उघडून काय तीर मारले, अशी टीका झाली. याच मानसिकतेमुळे स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही बँक खाती नव्हती. आता मात्र 34 कोटीपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली आहेत. जगात या काळात जेवढी खाती उघडली गेली, तेवढीच साधारण भारतात उघडली गेली. जनधनची खाती आधार नंबरची जोडली. आता यामुळे विरोधकांना पोटदुखी का होती?  इथे जनधन खाती उघडली जात होती, लाभार्थींना पैसे देण्यासाठी ही पारदर्शी योजना आणण्यासाठी खाती आधारला जोडली. एकेक योजना पारखून घेतली गेली.  425 योजनांचा पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात जातो. 6 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा केले आहेत. ही छोटी रक्कम नाही. पूर्ण 100 टक्के रक्कम लाभार्थींना मिळतच नव्हती. ती आता मिळते आहे, हे पूर्वी होत नव्हतं. ही त्यांची पोटदुखी आहे."

आधारमुळे 8 कोटी बनावट नाव उघड झाली

"आधारमुळे 425 योजनांचा पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात जातो. 6 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा केले आहेत. ही छोटी रक्कम नाही. पूर्ण 100 टक्के रक्कम लाभार्थींना मिळते आहे, हे पूर्वी होत नव्हतं. काळ्या पैशावर या योजनांचा काय परिणाम झाला? बनावट नावं पुढे यायला लागली. 50 लोक असतील ज्यांची आधारमुळे 8 कोटी बनावट नावं उघड झाली, ज्यांच्या नावावर सरकारी लाख ट्रान्सफर होत होती. चुकीच्या व्यक्तींवर 1 लाख 10 हजार कोटी रुपये खर्च होत होते. ते आता वाचताहेत. याचाच विरोधकांना त्रास होत आहे."

रोजगार वाढला, स्वयंरोजगार वाढले

गेल्या चार वर्षांत 4 कोटी लोकांना पहिल्या व्यवसायासाठी कर्ज मिळालं. एवढ्या मोठ्या संख्येने स्वयंरोजगारासाठी कधी प्रोत्साहित केलं गेलं होतं का? हे लोक त्यातून नवीन रोजगार निर्माण करणार आहेत. EPFO ला 5 लाख लोक दर महिन्याला जोडले गेले आहेत.  रोजगार वाढत आहेत. देशातले जॉब्ज जगासाठी नक्की आदर्श ठरतील. नवीन भारताच्या निर्माणासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असं पंतप्रधान शेवटी म्हणाले.

रायझिंग इंडिया ही दोन दिवसांची शिखर परिषद आज सुरू झाली. 26 फेब्रुवारीला अमित शाह, सुप्रिया सुळे, राम माधव, सचिन पायलट, स्मृती इराणी या राजकारण्यांबरोबरच दीपिका पदुकोण, तापसी पन्नी, मेरी कोम, अनिल कुंबळे आदी सेलेब्रिटी सहभागी होणार आहेत.

First published: February 25, 2019, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading