....म्हणून इम्रान खान यांच्याशी चर्चा करणार नाहीत पंतप्रधान मोदी

....म्हणून इम्रान खान यांच्याशी चर्चा करणार नाहीत पंतप्रधान मोदी

किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भेटतील पण या दोन नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा होणार नाही, असं स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 जून : किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भेटतील पण या दोन नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा होणार नाही, असं स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिलं आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सोहेल मेहमूद हे सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा आहे. बुधवारी ईदच्या निमित्ताने त्यांनी जामा मशिदीत जाऊन नमाज अदा केली. यामुळे दोन देशांमधले संबंध सुधारण्यासाठी द्वीपक्षीय चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण परराष्ट्र मंत्रालयानेच यावर भाष्य केलं आहे.

पुलवामा हल्ल्याचे परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान हे दोघंही 13 आणि 14 जूनला शांघायमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेसाठी उपस्थित असतील. पण नरेंद्र मोदी हे इम्रान खान यांच्याशी चर्चा करणार नाहीत. पाकिस्तानला पुलवामा हल्ल्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत, असंच यावरून दिसतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत पण इम्रान खान यांच्याशी कोणतीही चर्चा करण्याचा त्यांचा इरादा नाही.

दहशतवादविरोधी मोहीम सुरूच

सोहेल मेहमूद यांच्या भारत दौऱ्यानंतर, पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइक यानंतरही वाटाघाटी होऊ शकतात, असा कयास होता. पण आता या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हवाई हल्ल्याच्या रूपाने पाकिस्तानला कडवं प्रत्युत्तर दिलं. भारताच्या या दहशतवादविरोधी मोहिमेला सगळ्याच देशांनी पाठिंबा दिला होता.

=============================================================================================

VIDEO : उद्धव ठाकरेंनी मानले अदृश्य हातांचे आभार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बात

First published: June 6, 2019, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading