दहशतवादावर फक्त 'बोलण्या'ची नाही तर 'कृती'ची गरज - मोदी

दहशतवादावर फक्त 'बोलण्या'ची नाही तर 'कृती'ची गरज - मोदी

शांतात पुरस्कारात मिळालेली 1 कोटी 30 लाखांची रक्कम ही गंगा स्वच्छता अभियानाला पंतप्रधानांनी दिली आहे.

  • Share this:

सोल 22 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी प्रतिष्ठेचा सोल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शांततेसाठी काम करणाऱ्या नेत्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. 1 कोटी 30 लाख रुपये आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी दहशतवाद्याच्या मुद्यावर जागतिक समुदायाचं लक्ष वेधलं. दहशतवाद्या मुद्याववर फक्त बोलणं पुरेसं नाही तर कृतीची गरज असल्याचं मत पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्याचा आधार घेत पाकिस्तानवर टीका केली. ते म्हणाले, दहशतवाद हा मानवतेपुढचा सगळ्यात मोठा धोका आहे. दहशतवादामध्ये फरक करता येणार नाही. चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा फरक केला तर त्याचा जागतिक शांततेल धोका होऊ शकतो असंही ते म्हणाले.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताला साथ दिल्याबद्दल त्यांनी दक्षिण कोरियाचे आभार मानले. कोरियाचे गृहमंत्रालय आणि भारताचे गृहमंत्रालय यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आला. कोरिया आणि भारताचं रामायन काळापासून नातं असून ते नातं आणखी दृढ होईल असंही पंतप्रधान म्हणाले.
सोल शांतात पुरस्कारात मिळालेली 1 कोटी 30 लाखांची रक्कम ही गंगा स्वच्छता अभियानाला पंतप्रधानांनी दिली. हा पुरस्कार भारतातल्या जनतेल अर्पण करतो असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाआधी कोरियन मुलांनी वैष्णव जन तो हे भजन सादर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या