मोदींशी निष्ठा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्ता आल्यावर पाहून घेऊ - सिब्बल

मोदींशी निष्ठा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्ता आल्यावर पाहून घेऊ - सिब्बल

आज भाजपची सत्ता आहे. उद्या काँग्रेसची सत्ता येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे.

  • Share this:

नवी दिल्ली 10 फेब्रुवारी : काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी अधिकाऱ्यांना धमकीच दिली आहे. सत्ता ही कायम राहत नाही. ती येते आणि जाते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जास्तच निष्ठा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना आमची सत्ता आल्यावर पाहून घेऊ असा इशाराच सिब्बल यांनी दिला आहे.

सिब्बल म्हणाले, " निवडणुकीत जय पराजय होत असतो. आज भाजपची सत्ता आहे. उद्या काँग्रेसची सत्ता येईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. जास्त उत्साह आणि मोदींबद्दल जास्त निष्ठा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमची नजर आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही पाहून घेऊ." अशा धमकीच त्यांनी दिली.

राफेल प्रकरणावर कॅग सोमवारी आपला अहवाल देण्याची शक्यता असून तो संसदेतही मांडला जाणार आहे. त्यामुळे त्यावरही सिब्बल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्याचे महालेखापाल राजीव महर्षी हे अर्थ सचिव असतानाच राफेल करार झाला. त्यामुळे ते याबद्दल काही चौकशी करतील असं वाटतं नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

जे भ्रष्टाचारात सहभागी आहेत तेच चौकशी कशी करतील असंही ते म्हणाले. पहिले ते स्वत:ला वाचवतील आणि नंतर सरकारला. देशात अघोषीत आणीबाणी असून लोकांना बोलण्याचीही मुभा नाही अशी टीकाही त्यांनी केली. अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईत एका भाषणादरम्यान बोलताना अयोजकांनी टीका करायला मनाई केल्याने वाद निर्माण झाला आहे.

VIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

First published: February 10, 2019, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading