कलम 370 नंतरचा मोठा निर्णय, मोदी सरकारने प्रसिद्ध केला भारताचा नवा नकाशा!

कलम 370 नंतरचा मोठा निर्णय, मोदी सरकारने प्रसिद्ध केला भारताचा नवा नकाशा!

आता देशात 28 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेश झाले आहेत. 5 ऑगस्टला केंद सरकारने कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 2 नोव्हेंबर : जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कलम 370 हटवल्यानंतर गुरुवारी केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करत त्यातून लेह-लद्दाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून वेगळ केलं. त्यानंतर गृहमंत्रालयाने देशाचा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लेह-लद्दाखला वेगळं दाखविण्यात आलंय. आता देशात 28 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेश झाले आहेत. 5 ऑगस्टला संसदेने 370वं कलम हटविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी आता देशाचा नवा राजकीय नकाशा तयार झाला आहे.

जम्मू आणि काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा असला तर पाँडीचेरी सारखी विधानसभाही अस्तित्वात असणार आहे. तर लेह-लद्दाखची स्थिती चंदिगडसारखी असणार आहे. या दोनही राज्यांना स्वतंत्र नायब राज्यपाल राहणार असून त्यांची नियुक्तीही सरकारनं केलीय. गुजरात केडरचे IAS अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू (Girish Chandra Murmu) हे जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल असणार आहेत. तर राधाकृष्ण माथूर( Radha Krishna Mathur ) हे लेह-लद्दाखचे नायब राज्यपाल असणार आहेत.

ऑगस्ट महिन्यांपासून सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लावले होते. ते निर्बंध आता जवळपास हटविण्यात आले आहेत. मात्र फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती सहीत अनेक मोठी नेते अजुनही नजरकैदेत आहेतच आहेत. योग्य वेळी त्यांना सोडण्यात येईल असं केद्र सरकारने म्हटलं आहे.

अशी आहेत देशातली 28 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश

1. Andhra Pradesh

2. Arunachal Pradesh

3. Assam

4. Bihar

5. Chhattisgarh

6. Goa

7. Gujarat

8. Haryana

9. Himachal Pradesh

10. Jharkhand

11. Karnataka

12. Kerala

13. Madhya Pradesh

14. Maharashtra

15. Manipur

16. Meghalaya

17. Mizoram

18. Nagaland

19. Odisha

20. Punjab

21. Rajasthan

22. Sikkim

23. Tamil Nadu

24. Telangana

25. Tripura

26. Uttar Pradesh

27. Uttarakhand

28. West Bengal

केंद्र शासित प्रदेश

1. Andaman and Nicobar

2. Chandigarh

3. Daman and Diu

4. Dadar and Nagar Haveli

5. Delhi

6. Jammu and Kashmir

7. Ladakh

8. Lakshadweep

9. Puducherry

First published: November 2, 2019, 7:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading