लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार? केंद्र सरकारची तयारी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार? केंद्र सरकारची तयारी

लोकसभेसोबतच 11 राज्यांच्या निवडणूका एकाच वेळी घेण्याची तयारी केंद्र सरकार करत असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, ता.13 ऑगस्ट : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असतानाच केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लोकसभेसोबतच 11 राज्यांच्या निवडणूका एकाच वेळी घेण्याची तयारी केंद्र सरकार करत असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप गेल्या काही वर्षांपासून 'एक देश एक निवडणूक' या धोरणाचा जोरदार पुरस्कार करत आहे. तर विरोधी पक्षांनी याचा विरोध केलाय. देशात एकच वेळी निवडणूका घेण्यासाठी घटनादुरूस्तीची काहीही गरज नाही असं केंद्र सरकारचं मत आहे असंही या सूत्रांनी सांगितलंय.

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्या वेळी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान विधानसभेच्या निवडणूकाही होत असतात. या निवडणूकांआधी राजस्थान,मध्यप्रदेश,छत्तीगड आणि मिझोरामच्या निवडणूका होतात. या निवडणूका थोड्या लांबवून त्या लोकसभेसोबतच घेण्याचा सरकार विचार करतंय. तर महाराष्ट्र, झारखंड,बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये 2020 मध्ये निवडणूका होणार आहेत. तिथे मुदतीआधी निवडणूका घेतल्या जावू शकतात.

हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकार सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करण्याची शक्यता आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लॉ कमिशनला पत्र लिहून एक देश एक निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या आधी नीती आयोगाने देशात दोन टप्प्यांमध्ये 2024 पासून निवडणूका घेतल्या जावू शकतात असं म्हटलं होतं.

तर लॉ कमिशननेही यावर एक संशोधन प्रसिद्ध केलं होतं. काँग्रेस पक्षाने या निर्णयाला जोरदार विरोध केलाय तर ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधानांच्या या प्रस्तावाचं स्वागतं केलं होतं.

गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी

First published: August 13, 2018, 9:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading