अंतराळातल्या युद्धासाठीही भारत तयार, नरेंद्र मोदींनी घेतला हा निर्णय

अंतराळातल्या युद्धासाठीही भारत तयार, नरेंद्र मोदींनी घेतला हा निर्णय

भारताच्या अवकाशातल्या संरक्षण गरजा, शेजारचे देश, त्यांच्या सिद्धता, भविष्यातले धोके आणि गरजा या सगळ्यांचा अभ्यास करून ही संस्था आकाशात संरक्षण कवच निर्माण करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 11 जून : भूदल, हवाईदल आणि नौदलाला मजबूत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. भविष्यातली गरज लक्षात घेऊन भारताच्या अंतराळ सुरक्षेसाठी एक नवी संशोधन संस्था स्थापन केली जाणार आहे. या नव्या संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने मंजूरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Defence Space Research Agency (DSRA) असं या संस्थेचं नाव असून अंतराळातल्या धोक्यांची शक्यता लक्षात घेऊन या संस्थेत संशोधन केलं जाणार आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे यापुढची युद्ध ही जमीनीवर नाही तर आकाशात लढली जणार आहेत. त्याची चुणूक जगभरात दिसत आहेत. त्यामुळे या पातळीवरही भारताची संरक्षण सिद्धता मजबूत करणं गरजेचं आहे. याबाबत गेली काही वर्ष अनेक संरक्षण तज्ज्ञ सरकारकडे निर्णय घेण्याची मागणी करत होते.

काही महिन्यांपूर्वीच भारताने अंतराळातला उपग्रह पाडण्याची क्षमता मिळवली होती. अशी क्षमता असलेला भारत हा जगातला मोजक्या देशांपैकी एक देश झालाय. अंतराळात असलेल्या भारतीय उपग्रहांना काही धोका असेल तर त्याचा मुकाबला करण्याची भारताची ताकद आहे हे भारताने जगाला दाखवून दिलंय.

भारताच्या अवकाशातल्या संरक्षण गरजा, शेजारचे देश, त्यांच्या सिद्धता, भविष्यातले धोके आणि गरजा या सगळ्यांचा अभ्यास करून ही संस्था नवीन सिस्टिम्स तयार करणार आहे. भारताला मजबूत असं हवाई संरक्षण कवच निर्माण करणं हे या संस्थेचं मुख्य उद्दीष्ट राहणार आहे.

तीनही संरक्षणदलाचे अधिकारी आणि इस्त्रोचे शास्त्रज्ञ या नव्या संस्थेला पूर्ण मदत करणार आहेत.

First published: June 11, 2019, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading