नरेंद्र मोदी सरकारने साडेतीन कोटी कर्मचाऱ्यांना दिली ही खास भेट

नरेंद्र मोदी सरकारने साडेतीन कोटी कर्मचाऱ्यांना दिली ही खास भेट

नवे नियमांची 1 जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे. यात सुधारणाव्हावी अशी मागणी गेली कित्येक दिवस होत होती.

  • Share this:

नवी दिल्ली 13 जून : दुसऱ्यांदा पंतप्रधानपद सांभाळताच नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साडेतीन कोटी कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे. सराकरने काही सुधारणा केल्या असून त्याचा कंपनी आणि कर्मचाऱ्यांनाही फायदा होणार आहे. सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत ESI चं योगदान 6.5 टक्क्यांवरून कमी करून ते 4 टक्क्यांवर आणलं आहे. यात कंपनीचं योगदान 4.75 टक्क्यांवरून 3.25 एवढं केलं आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्याचं योगदान 1.75 टक्क्यांवरून 0.75 टक्के एवढं केलं आहे. त्याचा 3.6 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. 1 जुलैपासून हा निर्णय अंमलात येणार आहे.

दर कमी केल्यामुळे कर्मचारी आणि कंपन्यांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संख्येत वाढ होऊ शकेल तरच कंपन्यांवरचा बोजाही कमी होईल. त्याचबरोबर इज ऑफ डुईंग बिझनेससाठीही फायदा होणार आहे. त्याचबरोबर कंपन्या आता नियमांचं पालन करतील अशी आशा सरकारने व्यक्त केलीय.

ट्रेडवॉरचा फटका

अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वाॅर तर वाढतंच आहे.  वाॅल स्ट्रीटवरच्या सर्वात मोठ्या बँकांनी गुंतवणूकदारांना वाढत्या मंदीबद्दल सावध केलंय. इन्व्हेस्टमेंट बँक आणि फायनॅन्शियल सर्विसेज कंपनी माॅर्गन स्टेनली ( Morgan Stanley )नं एक पत्रक प्रसिद्ध केलं. त्यात असं म्हटलंय की अमेरिका आणि चीनमधलं ट्रेड वाॅर सुरूच राहिलं तर 9 महिन्याच्या आत जगभर मंदी सुरू होईल.

9 महिन्याच्या आत सुरू होईल मंदी

ब्लूमबर्गमध्ये आलेल्या माहितीनुसार माॅर्गन स्टेनलीचे मुख्य इकाॅनाॅमिक्स आणि ग्लोबल हेड आॅफ इकाॅनाॅमिक्स चेतन अह्या यांनी सांगितलं की अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 300 बिलियन डाॅलरशिवाय चिनी निर्यात 25 टक्के दरपत्रक लावलं आणि त्याला उत्तर म्हणून चीननं काही पावलं उचलली तर 9 महिन्याच्या आत मंदी सुरू होऊ शकते. जेपी माॅर्गन चेज अँड कंपनीनं सांगितलं की या वर्षी दुसऱ्या सहा महिन्यांत अमेरिकेत मंदीची शक्यता 25 टक्क्यांहून 40 टक्के झालीय.

First published: June 13, 2019, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading