Elec-widget

VIDEO मदरशांचा चेहेरा मोहोरा बदलण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा 'मास्टर प्लान'

VIDEO मदरशांचा चेहेरा मोहोरा बदलण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा 'मास्टर प्लान'

'या आधीच्या काँग्रेस सरकारांनी फक्त मतांवर डोळा ठेवून आणि तृष्टिकरणासाठी मुस्लिमांचा वापर केला. मुस्लिमांची व्होट बँक तयार करून त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या होत्या.'

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून :  मुस्लिम मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या देशातल्या मदरशांचं आधुनिकीकरण करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. इतर पारंपरिक विषयांसोबतच मदरशांमध्ये कॉम्प्युटर, गणित आणि इंग्रजी भाषाही शिकविली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. यासाठी केंद्र सरकार निधी देणार असून हा दूरगामी परिणाम करणारा निर्णय असेल अशी माहितीही त्यांनी दिली. याचबरोबर मदरशांमधल्या 5 कोटी मुला-मुलींना विशेष स्कॉलरशीपही देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाचं बजेट दुप्पट केलं आहे. या आधी दोन हजारकोटी रुपये असलेल्या या मंत्रालयाला आता 5 हजार कोटींपेक्षा जास्त निधी मिळणार आहे. या निर्णयामुळे मुस्लिम समाजातल्या गरीब-मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळेल असंही अब्बास यांनी सांगितंलं.

देशातल्या मदरशांची प्रतिमा लोकांमध्ये चांगली नाही. इथं कट्टरतावादाचं शिक्षण दिलं जाते अशी सार्वत्रिक भावना आहे. तर अनेक मदरशांचा वापर कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी करण्यात येतो असंही आढळून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार तुष्टीकरणाचा विचार न करता किंवा फक्त मतं मिळावेत म्हणून असे निर्णय घेत नाही तर समाजाच्या सर्वांगिण कल्याणाचा विचार त्यामागे आहे असं मतही अब्बास यांनी व्यक्त केलं.



या आधीच्या काँग्रेस सरकारांनी फक्त मतांवर डोळा ठेवून आणि तृष्टिकरणासाठी मुस्लिमांचा वापर केला. मुस्लिमांची व्होट बँक तयार करून त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या होत्या अशी टीकाही त्यांनी केली. मुस्लिम तरुण मुख्य प्रवाहात आले. आधुनिक शिक्षण त्यांना मिळालं तर त्यात देशाचं खूप मोठं कल्याण होणार असून मुस्लिम समाज गरिबीतून वर येणास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं.

Loading...



मोदी सकारच्या प्रयत्नांमुळेच हजला जाणाऱ्या कोट्यात गेल्या 70 वर्षांमध्ये झाली नाही एवढी मोठी वाढ झाली अशी माहितीही मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...