केंद्र सरकारनं या सहा पिकांच्या हमीभावात केली वाढ

केंद्र सरकारनं या सहा पिकांच्या हमीभावात केली वाढ

केंद्र सरकारनं प्रमुख 6 रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. यामध्ये प्रामुख्यानं गव्हाचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : शेतकऱ्यांच्या कालच्या आंदोलनानंतर आज केंद्र सरकारनं प्रमुख 6 रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. यामध्ये प्रामुख्यानं गव्हाचा समावेश आहे. गव्हाच्या हमीभावात 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर सूर्यफूलाला 845 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरभऱ्याला 220 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर बार्ली - 30, मोहरी - 200 आणि मसूरच्या आधारभूत किमतीत  225 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत 2018-19 या रब्बी हंगामातल्या सर्व रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्राचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पिकांच्या किमान आधारभूत किमतीत करण्यात आलेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना 62,632 कोटी रूपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार असून उत्पादन खर्चाच्या वर किमान 50 टक्के परतावा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हायला मदत होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत प्रती क्विंटल 105 रुपये, बार्ली प्रती क्विंटल 30 रुपये, मसूर प्रती क्विंटल 225 रुपये, हरभरा प्रती क्विंटल 220 रुपये, मोहरी प्रती क्विंटल 200 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांसाठी निश्चित केलेला हमीभाव उत्पादन खर्चापेक्षा जास्त असल्याचे सरकारने म्हटले आहे. गव्हाचा उत्पादन खर्च प्रती क्विंटल 866 रुपये असून, त्याची किमान आधारभूत किमत 1840 रुपये प्रती क्विंटल आहे. उत्पादन खर्चाच्या 112.5 टक्के परतावा शेतकऱ्याला मिळणार आहे. बार्ली साठी उत्पादन खर्च प्रती क्विंटल 860 रुपये आहे तर त्याची किमान आधारभूत किमत 1440 रुपये प्रती क्विंटल आहे. उत्पादन खर्चाच्या67.4 टक्के परतावा शेतकऱ्याला मिळणार आहे.

मसूरचा उत्पादन खर्च प्रती क्विंटल 2532 रुपये असून, किमान आधारभूत किमत 4475 रुपये प्रती क्विंटल आहे. यामुळे उत्पादन खर्चाच्या 76.7 टक्के परतावा शेतकऱ्याला मिळेल असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय.

केंद्र सरकारच्या शेती आणि शेतकरी विषयक धोरणाला विरोध करण्यासाठी भारतीय किसान सभेनं 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. लाखो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, दिल्लीच्या वेशीवर असतानाच मोर्चातील शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. यात शेकडो शेतकरी जखमी देखील झाले होते.

अशा आहेत आधारभूत किमती...

गहू - 105

हरभरा - 220

बार्ली - 30

सूर्यफूल - 845

मोहरी - 200

मसूर - 225

 VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 09:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading