नवी दिल्ली 6 जानेवारी :निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. शतकरी, कर्मचारी आणि छोट्या उद्योगांना मदत मिळावी यासाठी सवलतींचा वर्षाव करण्याची शक्यता आहे. त्यातलाच एक भाग म्हणून भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखे कर्मचारी आणि निवृत्ती धारकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकांना आता फक्त 5 महिने शिल्लक आहेत. मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी सरकारककडे जेमतेम दीड महिन्यांचा कालावधी आहे. या दिवसांमध्ये केंद्र सरकार निर्णयांचा धडाका लावण्याची शक्यता आहे.
पीएफ वर निर्णय घेण्यासाछी EPFO ची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खातेधारकाला आपल्या पीएफचे पैशांमधून गुंतवणूकही करण्याची मुभा मिळावी यासाठीही नियमांमध्ये बदल करण्याची विचार सुरू आहे. सध्या पीएफ चा व्याजदर 8.55 टक्के एवढा आहे.
चार महिन्यांपूर्वीच झाली होती वाढ
सप्टेंबर महिन्यातच सरकारने पीएफच्या व्याजदरात 0.4 टक्क्यांची वाढ केली होती. सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदरही ८.१ टक्क्यांवरून ८.५ टक्के करण्यात आला होता. छोट्या गुंतवणूकदारांना वर्षानुवर्षं साथ देणाऱ्या किसान विकास पत्रांवर यापुढे ७.३ टक्क्यांऐवजी ७.७ टक्के वाढ केला होती.तर रिकरिंग डिपॉझिट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील नवे व्याजदर अनुक्रमे ७.८ टक्के, ७.३ टक्के आणि ८.७ टक्के असे होते.
त्यासोबतच, सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदर ८.१ टक्क्यांवरून ८.५ टक्के करण्यात आल्याचंही जाहीर केलं. छोट्या गुंतवणूकदारांना वर्षानुवर्षं साथ देणाऱ्या किसान विकास पत्रांवर यापुढे ७.३ टक्क्यांऐवजी ७.७ टक्के व्याज मिळणार आहे. हे नवे व्याजदर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी आहेत.
पाच वर्षांसाठीची मुदत ठेव योजना, रिकरिंग डिपॉझिट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील नवे व्याजदर अनुक्रमे ७.८ टक्के, ७.३ टक्के आणि ८.७ टक्के असे आहेत. पीपीएफप्रमाणेच राष्ट्रीय बचत योजनेतील रकमेवरही ८ टक्के दराने व्याज दिलं जाणार आहे.