Home /News /national /

भारताचे व्हेंटिलेटर्स विदेशात वाचवणार COVID-19 रुग्णांचे प्राण, निर्यातीला परवानगी

भारताचे व्हेंटिलेटर्स विदेशात वाचवणार COVID-19 रुग्णांचे प्राण, निर्यातीला परवानगी

भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.15 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.

    नवी दिल्ली 1 ऑगस्ट: भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर नियंत्रित  राखण्यात यश मिळ्याल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला होता. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत भारतीय व्हेंटिलेटर्सच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा मृत्यूदर हा 2.15 टक्के असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताला लागणाऱ्या व्हेंटिलेटर्सची संख्या पुरेशी असल्याने निर्यातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भारताचे व्हेंटिलेटर्स हे विदेशात कोरोना रुग्णांचे प्राण वाचविणार आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे भारतीय कंपन्यांना फायदाही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशात आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. देशासाठी ही दिलासा देणारी गोष्ट असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशाचा रिकव्हरी रेट हा 64.5 टक्के असून पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे 33.27 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली. आता ‘हेल्मेट’ घातलं तरीही होणार दंड, बाईक चालवत असाल तर जाणून घ्या नवे नियम! भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.15 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशातल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये केवळ 0.28 टक्के रुग्णच हे व्हेंटिलेटर्सवर आहेत. देशात 1.61 रुग्णांना ICU ची गरज आहे. तर 2.32 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता. ही संख्या आटोक्यात राहावी असा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या राज्यांना आत्तापर्यंत 268.25 लाख N 95 मास्क, 120.40 लाख पीपीई किट आणि 1083.77 लाख HCQच्या गोळ्यांचा पुरवढा केल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली. अमरसिंगांचं बॉलिवूडशी होतं ‘कलरफूल’ नातं, जया प्रदांना बनवलं थेट खासदार दरम्यान, कोरोनावर लस शोधण्यात अमेरिकेतले तज्ज्ञ आघाडीवर आहेत. ऑक्सफर्डच्या लशीचे निकाल आशा वाढवणारे असल्याने तज्ज्ञांचा हुरुप वाढला आहे. या वर्षाच्या शेवटी किंवा 2021च्या सुरुवातीला कोरोनावर लस येईल असा दावा साथ रोग विषयातले अमेरिकेचे क्रमांक एकचे डॉक्टर अँथोनो फाउसी यांनी केलाय. डॉ. फाउसी यांनी अमेरिकेन काँग्रेसच्या सदस्यांपुढे बोलतांना हा दावा केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या