नेदरलँडच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना दिली सायकल भेट

नेदरलँडच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना दिली सायकल भेट

पंतप्रधान मोदी नुकतेच परदेश दौऱ्याहून परतले. यावेळी पोर्तुगाल आणि अमेरिकेला भेट दिल्यानंतर मोदी नेदरलँण्डला गेले.

  • Share this:

28 जून : पंतप्रधान मोदी नुकतेच परदेश दौऱ्याहून परतले. यावेळी पोर्तुगाल आणि अमेरिकेला भेट दिल्यानंतर मोदी नेदरलँण्डला गेले. या भेटीत नेदरलँडचे राष्ट्राध्यक्ष मार्क रुट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क सायकल गिफ्ट केलीय. सायकल भेटीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दरम्यान या दौऱ्यादरम्यान मोदींनी नेदरलँण्ड्समधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी आपल्या भाषणाची सुरूवात मोदींनी चक्क भोजपुरीत करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

नरेंद्र मोदी अमेरिका, पोर्तुगाल आणि नेदरलँण्ड्सच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यासाठी मोदींना एकूण 95 तासाहून जास्त लागले, पण विशेष म्हणजे यामधील 33 तास त्यांनी विमान प्रवास केला. म्हणजे तब्बल 33 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी एअरप्लेन मोडमध्ये होते. आश्चर्य वाटेल मात्र त्यांनी तिन्ही देशांमध्ये सलग 33 कार्यक्रम आणि बैठकींना हजेरी लावली.

 पंतप्रधान मोदींनी आपल्या या व्यस्त दौऱ्यातील चारपैकी दोन रात्री विमानातच घालवल्या. पोर्तुगाल किंवा नेदरलँण्डमध्ये मुक्काम करण्याचा पर्याय मोदींकडे असतानाही त्यांनी तो वेळ तिथे खर्च करण्याऐवजी विमान प्रवासात करण्यावर भर दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी मीटिंग नसेल तर नरेंद्र मोदी त्या रात्री त्या देशात मुक्काम करत नाहीत. वेळेतील फरकाचा फायदा घेत कामाचे तास कसे वाढतील ते बघा अशा सूचना देण्यात येतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 01:10 PM IST

ताज्या बातम्या