मराठी बातम्या /बातम्या /देश /

नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पना टाकलं मागं ; इथं पटकावला पहिला नंबर

नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पना टाकलं मागं ; इथं पटकावला पहिला नंबर

मुंबई, 13 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2014. या वर्षापासून देशाच्या राजकारणात मोदी पर्वाची सुरूवात झाली असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण, मोदी लाटेत विरोधकांचा मोठा पराभव झाला. सोशल मीडियाचा केलेला प्रभावी वापर आणि योग्य प्रचार या मुद्यावर केंद्रात एनडीएचं सरकार आहे. दरम्यान, त्यानंतर देखील नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता वाढताना देखील दिसत आहे. पण, या लोकप्रियतेमध्ये त्यांनी आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मागे टाकलं आहे. 2019चा 'वर्ल्ड लीडर्स ऑन फेसबुक'चा रिपोर्ट आता आला आहे. त्यामध्ये मोदींनी जगातील सर्व नेत्यांना मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावला आहे. हा रिपोर्ट 'ट्विप्लोमेसी'चा भाग आहे. 'बीसीडब्लू' या संस्थेनं हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार मोदी पहिल्या, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तिसऱ्या स्थानावर ब्राझीलचे राष्ट्रपती आहेत. 962 पेजचं विश्लेषण दरम्यान, हा रिपोर्ट तयार करण्यासाठी 962 पेजचं विश्लेषण करण्यात आलं. यामध्ये नरेंद्र मोदींच्या पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत. दुसऱ्या नंबरवर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेजला 2.30 कोटी लाईक्स आहेत. 19 वर्षांपूर्वी घराघरात हवी होती स्मृती इराणींसारखी सून नरेंद्र मोदींना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. रशियाने ट्वीट करून हा निर्णय जाहीर केला. रशियाने दिलेला हा पुरस्कार ही जागतिक राजकीय घडामोडींमध्ये मोठी बातमी असल्याचं मानलं जात आहे. एकाच वेळी रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध दृढ होत असल्याचं हे लक्षण मानलं जात आहे. मोदींनी स्वतः केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांनंतर आता ही बातमी येत आहे. VIDEO: 'कोल्हा' म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांवर राजू शेट्टींचा पलटवार; म्हणाले..
First published:

Tags: Facebook, Narendra modi, Social media

पुढील बातम्या