Home /News /national /

शेतकऱ्यांचं आंदोलन: आता थेट PM मोदीच मैदानात, मराठीत ट्वीट करत केलं आवाहन

शेतकऱ्यांचं आंदोलन: आता थेट PM मोदीच मैदानात, मराठीत ट्वीट करत केलं आवाहन

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी मध्यप्रदेशातल्या शेतकऱ्यांशी बोलताना सगळ्यांना हात जोडून विनंती केली होती. विरोधी पक्षांनी त्याचं श्रेय घ्यावं मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं.

    नवी दिल्ली 19 डिसेंबर: केंद्राच्या नव्या कृषी विधेयकां विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 25 वा दिवस आहे. तोडगा निघत नसल्याने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मैदानात उतरले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना लिहिलेलं पत्र देत पंतप्रधानांनी मराठीमध्ये ट्वीट करत शेतकऱ्यांनी ते पत्र वाचावे असं आग्राहाचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. कृषीमंत्र्याचं ते पत्र मराठीत भाषांतरीत करण्यात आलं आहे. मराठी बरोबरच इतर प्रादेशिक भाषांमध्येही पंतप्रधानांनी ट्वीट करत शेतकऱ्यांशी संवादाचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत संवाद साधला. या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता थेट पंतप्रधानांनीच पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी मध्यप्रदेशातल्या शेतकऱ्यांशी बोलताना सगळ्यांना हात जोडून विनंती केली होती. विरोधी पक्षांनी त्याचं श्रेय घ्यावं मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं. कृषिमंत्र्यांनी लिहिलेल्या भावनिक पत्रात त्यांनी सर्व आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण स्वत: शेतकरी असून शेतात काम करण्यापासून ते माल विकण्यापर्यंत सर्व गोष्टींचा अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. MSP आणि APMCला कुठलाही धक्का लागणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं. आता या पत्राचं सर्व भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं असून ते पत्र देशभर पोहोचवावं असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या