शरद पवारांनंतर आता मोदींनीही असं साधलं 'पगडी पॉलिटिक्स'

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (9 जानेवीरी)महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सोलापुरातल्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी मोदींच्या भाषणातल्या मुद्द्यांपेक्षा चर्चा झाली ते त्यांच्या पगडी पॉलिटिक्सची.

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरातील विकासकामांच्या उद्घाटनावेळी काँग्रेसवर राफेलच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केला.

पण मोदींच्या भाषणातल्या मुद्द्यांपेक्षा चर्चा झाली ते त्यांच्या पगडी पॉलिटिक्सची.

समाजातील सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला, असं या कार्यक्रमाच्या आयोजनातून दिसलं.

मोदींनी भाषणाच्या वेळी पुणेरी पगडी परिधान केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींना तलवार भेट दिली आणि घोंगडीही.

पगडी, तलवार आणि घोंगडीच्या प्रतीकांमधून भाजपने ब्राह्मण, मराठा आणि धनगर समाजांना खुश करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

मोदी सरकारने अनपेक्षितपणे सवर्णांसाठी आरक्षणाचं विधेयक आणल्यामुळे उच्च जातीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्यंतरी पुण्याच्या एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ब्राह्मणी वर्चस्ववादाचं प्रतीक म्हणून पुणेरी पगडी नाकारून ज्योतिबा फुलेंच्या पगडीचा आग्रह धरला होता.

पवार आणि छगन भुजबळ यांची पुणेरी पगडीविरोधातली ही जाहीर भूमिका जाताधारित पगडी पॉलिटिक्स म्हणून गाजली होती.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपसुद्धा हाच पगडी पॉलिटिक्सचा कित्ता गिरवत आहे.

अर्थात हे पगडी पॉलिटिक्स नवं नाही. 2014 मधला हा राहुल गांधींचा पुण्याचा फोटो याची प्रचिती देईल. गांधीटोपीपासून पगडीपर्यंत सगळं काही पॉलिटिक्स राहुल गांधींनी पुण्याच्या एकाच दिवसाच्या दौऱ्यात करून दाखवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 08:17 PM IST

ताज्या बातम्या