स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं 21 लाखांचं दान

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं 21 लाखांचं दान

मोदी गुजराचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दरवर्षी त्यांना आलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करुन आलेले पैसे त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिले होते.

  • Share this:

नवी दिल्ली 6 मार्च  : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुंभ मेळ्यात स्नान केल्यानंतर पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुवून चरणवंदन केलं होतं. त्यानंतर त्यावर बरीच चर्चाही झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वयक्तिक बचतीमधून 21 लाख रुपये कुंभ मेळ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीत दान दिले आहेत.

पंतप्रधानांच्या चरणवंदने नंतर सोशल मीडियावरून त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते की तुम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी काय काम केलं? या टीकेला पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. या आधी मोदी गुजराचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दरवर्षी त्यांना आलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करुन आलेले पैसे त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिले होते.

तर पंतप्रधानांना गेल्या चाडेचार वर्षात ज्या भेट वस्तू मिळाल्या होत्या त्याचा लिलाव करुन त्यातून मिळालेले 3 कोटी 40 लाख रुपये आणि सोल शांतता पुरस्काराची 1.3 कोटींची रक्कम नमामी गंगे उपक्रमाला दान दिली होती.

पंतप्रधानांनी धुतले सफाई कर्मचाऱ्यांचे पाय

प्रयागराज इथं कुंभात स्नानासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एका कामाने नवा आदर्श घालून दिला. गंगेत स्नान केल्यानंतर त्यांनी गंगेची पूजा आणि आरती केली. यावेळी कुंभ मेळ्यात स्वच्छतेची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जगभर त्याचं कौतुक होतंय. त्यामुळं पंतप्रधानांनी  स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतले, त्यांना चरणवंदन केलं आणि त्यांचा सत्कारही केला.

चार पुरुष आणि दोन महिला कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी पाय धुतले आणि अभिवादन करत त्यांचे आभार मानले. पंतप्रधानांच्या या कृतीने सर्व कर्मचारी भारावून गेले होते. नंतर झालेल्या जाहीर सभेतही पंतप्रधानांनी कुंभात स्वच्छतेचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. त्यांच्या कामामुळेच कुंभ दिव्य आणि भव्य झाल्याचं ते म्हणाले.

First published: March 6, 2019, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading