'नोटबंदी'नंतर नरेंद्र मोदी आणखी एक घेणार मोठा निर्णय!

'नोटबंदी'नंतर नरेंद्र मोदी आणखी एक घेणार मोठा निर्णय!

डिजिटल नोटा आणि व्यवहार मोठ्या प्रमाणार झाले तर खर्चातही मोठी बचत होणार आहे. त्याचबरोबर काळ्या पैशालाही लगाम बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 4 डिसेंबर : नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कागदाच्या नोटांबरोबरच आता डिजिटल नोटाही चलनात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसचिवांच्या अध्यक्षतेखालील एका समितीनं डिजिटल नोटांबाबात शिफारसी केल्याची माहिती 'CNBC आवाज' ने दिली आहे. काही डिजिटल नोटांवर सरकार व्याजही देण्याची शक्यता आहे.

नोटबंदीच्या निर्णयानंतर कागदी नोटांचा वापर कमी करण्यावर सरकारनं मोठा भर दिला होता. त्यानंतर डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी केंद्रानं अनेक योजनाही जाहीर केल्या. डिजिटल व्यवहारावर सवलती देण्याची घोषणाही सरकारने केली होती.

त्याचबरोबर अर्थ सचिवांच्या नेतृत्वाखाली एका समिती तयार करून त्यांना डिजिटल नोटांबाबत अहवाल देण्यासही सांगितलं होतं. त्यानंतर या समितीने अभ्यास करून एक विस्तृत अहवाल तयार केला असून तो केंद्राला सादर केला आहे.

यात दोन वेगवेगळ्या डिजिटल नोटा जारी करण्याची शिफारस या समितीने केल्या असून त्यातल्या एका नोटेवर सरकारने व्याज द्यावं अशी शिफारसही या समितीने केली आहे. या नोटांवरही रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण राहणार आहे. यासाठी आरबीआयच्या कॉईन अँड करंसी अॅक्ट मध्ये काही बदल करावे लागणार आहेत. डिजिटल व्यवहार आणि त्यांचा स्त्रोत याची माहिती गोपनीय राहणार आहे.

यात डिजिटल लेसर तंत्रज्ञानाचा वापरही केला जाणार आहे. RBI, SEBI, IRDA, PFRDA या संस्थांनी डिजिटल नोटांच्या व्यवहारासाठी नियमावली तयार करावी असंही या समितीने म्हटलं आहे. बिट कॉईन आणि क्रिप्टो करंसीवर बंदी असावी असंही या समितीचं मत आहे.

डिजिटल नोटा आणि व्यवहार मोठ्या प्रमाणार झाले तर खर्चातही मोठी बचत होणार आहे. त्याचबरोबर काळ्या पैशालाही लगाम बसण्याची शक्यता आहे.

Video : 'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना

First published: December 5, 2018, 8:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading