मराठी बातम्या /बातम्या /देश /बंगालमधील प्रचारसभेत मोदींचं ममता बॅनर्जींवर टीकास्त्र, WhatsApp Downच्या घटनेसोबत जोडला संबंध

बंगालमधील प्रचारसभेत मोदींचं ममता बॅनर्जींवर टीकास्त्र, WhatsApp Downच्या घटनेसोबत जोडला संबंध

मोदी म्हणाले, की काल रात्री 50 ते 55 मिनिटांसाठी व्हॉट्सअॅप डाउन ( Narendra Modi on WhatsApp Down) झालं, यामुळे सगळे अस्वस्थ झाले होते. बंगालमध्ये तर मागील 55 वर्षांपासून विकास, विश्वास आणि स्वप्न गायब झाले आहेत.

नवी दिल्ली 20 मार्च : पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभेसाठी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी वेगळ्याच अंदाजात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला (Narendra Modi Criticised Mamata Banerjee). यावेळी बोलताना मोदींनी शुक्रवारी डाउन झालेल्या WhatsApp चा उल्लेख केला. मोदी म्हणाले, की काल रात्री 50 ते 55 मिनिटांसाठी व्हॉट्सअॅप डाउन (Narendra Modi on WhatsApp Down) झालं, यामुळे सगळे अस्वस्थ झाले होते. बंगालमध्ये तर मागील 55 वर्षांपासून विकास, विश्वास आणि स्वप्न गायब झाले आहेत. या सगळ्या गोष्टींनी बंगालचे लोक अस्वस्थ होणार नाहीत का?

पंतप्रधान मोदी म्हणाले, की व्हॉट्सअॅप 55 मिनिटं बंद राहिलं तरी लोक अस्वस्थ झाले. मात्र, बंगालमध्ये तर ५५ वर्षांपासून विकास शटडाउन आहे. मग तुम्हीच सांगा बंगालची जनता अस्वस्थ होणार नाही का. असं म्हणतंच मोदींनी लोकांना आवाहन केलं, की राज्यात भाजपाला भरपूर मतदान होईल, असा संकल्प करुनच आपल्याला इथून जायचं आहे.

पीएम मोदी खडगपूरमधीर रॅलीमध्ये म्हणाले, ही निवडणूक आमदार, मुख्यमंत्री किंवा मंत्री बदलण्यासाठी नाही. तर, सोनार बांगलाच्या निर्माणाच्या संकल्पासाठी आहे. यावेळी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका करताना मोदी म्हणाले, की दीदीकडे पश्चिम बंगालमधील लोक दहा वर्षापासून हिशोब मागत आहेत. ते म्हणाले, राशन चोरीचं उत्तर मागितलं, की तुरुंगात टाकलं जातं. कोळसा घोटाळ्याबद्दल प्रश्न केले तर पोलिसांकडून मारपीट केली जाते.

ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीला चिरडून टाकल्याचा आरोप करीत पीएम मोदी म्हणाले, "मी बंगालच्या लोकांना आश्वासन देतो, आता दीदीला लोकशाही चिरडण्यास परवानगी दिली जाणार नाही. घटना आणि लोकशाहीच्या मर्यादा यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही, हे पोलीस आणि प्रशासनाने लक्षात ठेवलं पाहिजे. बाबा साहेबांनी तयार बनवलेल्या संविधानानुसार, प्रत्येत भारतीयाला मतदानाचं स्वतंत्र आहे. मात्र बंगालमध्ये दीदी मतदान करण्याची ताकदचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

First published:
top videos

    Tags: BJP, Mamata banerjee, Narendra modi, TMC, West Bengal Election