मोदींचा झंझावाती प्रचार : 125 दिवसांत 125 कोटींपर्यंत कसे पोहोचले पंतप्रधान?

मोदींचा झंझावाती प्रचार : 125 दिवसांत 125 कोटींपर्यंत कसे पोहोचले पंतप्रधान?

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झंझावाती प्रचार केला. गेल्या काही महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या राज्यांत 200 कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांचा हा प्रचार पाहिला तर मोदींनी 125 दिवसांत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत पिंजून काढला आणि ते जवळजवळ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचले.

  • Share this:

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झंझावाती प्रचार केला. गेल्या काही महिन्यांत त्यांनी वेगवेगळ्या राज्यांत 200 कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांचा हा प्रचार पाहिला तर मोदींनी 125 दिवसांत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत पिंजून काढला आणि ते जवळजवळ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचले, असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

विद्यार्थ्यांपासून ते शास्त्रज्ञ, शेतकरी, उद्योजक, परदेशी प्रमुख, राजकीय कार्यकर्ते अशा वेगवेगळ्या लोकांशी त्यांनी संवाद साधला.

25 डिसेंबर ते 1 मे

या जनसंपर्कावरून मोदींच्या कामाची अनोखी पद्धत आणि एका वेळी अनेक गोष्टी करण्याची त्यांची क्षमता लक्षात येते. 25 डिसेंबर ते 1 मे या काळत मोदींनी लोकसभेसाठीचा हा झंझावाती प्रचार केला आहे.

या दौऱ्यात मोदींनी काही वचनं दिली आणि ती लवकरात लवकर पूर्ण करण्याची आश्वासनं दिली. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजनांवर मोदींच्या वेबसाइटवर भर देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी वर्षाला 6 हजार रुपये देण्याची योजना आणि असंघटित कामगारांना पेन्शन याही या सरकारच्या महत्त्वाच्या घोषणा.

पुलवामा आणि एअर स्ट्राइक

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याला धैर्याने उत्तर देण्याचे नेतृत्वगुण मोदींनी दाखवले. भारताच्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानने बचावात्मक पवित्रा घेतला. यानतंर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं.भारताने यासाठी अनेक देशांचा पाठिंबा मिळवला हेही मोदींच्या कूटनीतीचं यश मानलं जात आहे.

नरेंद्र मोदींनी ईशान्येकडची राज्य तसंच अंदमान निकोबार सारखे दूरचे प्रदेशही काबीज केले. स्वातंत्र्यलीर सावरकरांसह आणखी स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी पोर्ट ब्लेअरचा दौरा केला.

वाराणसीला 5 वेळा भेट

या 125 दिवसांत मोदींनी वाराणसी मतदारसंघाला पाच वेळा भेट दिली आणि तिथेही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. वाराणसीमध्ये पायाभूत सुविधा, वीजपुरवठा आणि स्वच्छता यावर भर दिला.

कुंभमेळ्यामध्ये स्वच्छता कामगारांचे पाय धुणारे पंतप्रधान कुणीही विसरू शकत नाही, असंही या वेबसाइटवर म्हटलं आहे.

मोदींच्या या प्रचंड व्यग्र वेळापत्रकात लांब पल्ल्याचा हवाई प्रवास, हेलकॉप्टरच्या सफरींचा समावेश आहे.मोदींचा दिवस लवकर सुरू होऊन उशिरा संपत असे. पण लोकांशी संवाद साधण्यात एक वेगळाच आनंद होता,असं मोदींचं म्हणणं आहे.

=========================================================================

VIDEO: स्मृती इराणींचा अमेठीत राहुल गांधींवर हल्लाबोल, मराठीतून साधला संवाद

First published: May 4, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading