15 डिसेंबर : तिहेरी तलाक विरोधातील विधेयकाच्या मसुद्याला हिवाळी अधिवेशानात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. दोन्ही सभागृहात या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आलीये.
मोदी सरकारने तिहेरी तलाक प्रथेवर बंदी आणण्यासाठी पाऊल उचलले. यासाठी मोदी सरकारने 'द मुस्लिम वूमेन प्रोटेक्शन आॅफ राईटस इन मॅरीज एक्ट' हे विधेयक आणलंय. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आलाय. आज या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आलीये. हे विधेयक मागील तारखेपासून मंजूर करण्यात येईल अशी शक्यता आहे.
मसुद्यात कठोर तरतुदी
या विधेयकाच्या मसूद्यात तीन तलाकविरोधात कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. तिहेरी तलाक दिल्यास तो दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून याप्रकरणी दोषी ठरल्यास ३ वर्षे कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार आहे. हा कायदा केवळ तीन तलाकविरोधातच लागू केला जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा