बंगळुरू, 14 ऑगस्ट : विश्र्व ईधन दिनानिमीत्त 10 ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांडपाण्याच्या नाल्यातून उत्सर्जित होणाऱ्या गॅसवर चहा तयार करणाऱ्या व्यक्तिचा उल्लेख केला होता. त्यावर काँग्रेस आणि अन्य पक्षांनी मोदींची खिल्ली उडवली होती. पण, आता मोदींच्या त्या वक्तव्यावर शिक्तामोर्तब झालंय. छत्तीसगढच्या रायपुरमध्ये राहणाऱ्या शामराव विर्के यांनी बायो-सीएनजीचं एक मिनी कंटेनर तयार केलं असून, त्यात नाल्यात तयार होणारा गॅस संग्रहित केला जाऊ शकतो असा दावा त्यांनी केलाय.
ANI शी बोलताना शामराव विर्के म्हणाले की, सर्वप्रथम त्यांनी नालीतले पाणी गोळा करण्यासाठी एक लहानसं कंटेनर तयार केलं. त्यातून निघणारा गॅस एकत्रित करण्यासाठी एक सिलिंडर बनवलं. परीक्षण करतेवेळी त्यांनी त्या सिलिंडरची नळी गॅस स्टोव्हला जोडली आणि चमत्कार झाला. यावेळी सर्वप्रथम मी चहा तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी हा प्रयोग घरातला स्वयंपाक करण्यासाठी केला.
ते पुढे म्हणाले की, नाल्यातल्या घाण पाण्यातून मीथेन गॅस उत्सर्जित होतो, ज्यामुळे प्रदुषणात वाढ होते. या गॅसचा वापर आपण ईंधन म्हणून करू शकतो आणि ते देशासाठी फायद्याचेदेखील आहे. मी तयार केलेल्या उपकरणाचं माझ्या नावावर पेटंटसुद्धा असल्याचे शामरावांनी ANI शी बोलताना सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangalore, From Drain, From Methane gas, Made, Narendra modi, Shamrao vrike, Tea, Water