'कोण होणार पंतप्रधान ? हा खेळ खेळणाऱ्यांचं स्वप्न भंगलं', नरेंद्र मोदींचा दावा

जे लोक काही दिवसांपूर्वी कोण होणार पंतप्रधान हा खेळ खेळत होते त्यांचं स्वप्न आता भंगलं आहे, अशा शब्दात मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. नरेंद्र मोदींनी आता उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 07:57 PM IST

'कोण होणार पंतप्रधान ? हा खेळ खेळणाऱ्यांचं स्वप्न भंगलं', नरेंद्र मोदींचा दावा

नवी दिल्ली, 30 एप्रिल : लोकसभा निवडणुकांच्या उरलेल्या तीन टप्प्यात सगळ्यांचं लक्ष पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशकडे लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यांमध्ये प्रचारदौरे करत सभा घेत आहेत.

जे लोक काही दिवसांपूर्वी कोण होणार पंतप्रधान हा खेळ खेळत होते त्यांचं स्वप्न आता भंगलं आहे, अशा शब्दात मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. मतदानाचे चार टप्पे झाल्यानंतर आता हे लोक गायब झाले आहेत कारण मतदारांनी त्यांच्या स्वप्नांचा भंग केला आहे,अशी टिप्पणी मोदींनी केली.

'चौकिदाराचा अंदाज नव्हता'

2014 च्या निवडणुकीत देशातली जनता या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक चौकीदार बसवेल याचा विरोधकांना अंदाज नव्हता. आता गेल्या 5 वर्षांत या चौकिदाराने सगळ्यांची पोलखोल केली आहे, असं ते म्हणाले. आमच्या सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली, त्यामुळे या सगळ्यांनी 'मोदी हटवा' हा अजेंडा बनवला होता पण त्यांचा हा अजेंडा मतदारांना नको आहे, असा दावा त्यांनी केला.

शरद पवारांबद्दल विधान

Loading...

महाराष्ट्रातही पंतप्रधानपदावरून चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं विधान माजिद मेमन यांनी केलं आहे. 'सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात मोट बांधावी आणि शरद पवार यांना पंतप्रधानपदी विराजमान करावे, असं आवाहन मेमन यांनी केलं आहे.

'विरोधकांनी एकत्र यावं'

2019मध्ये एनडीएचं सरकार येणार नाही, त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पवारांना देशाच्या पंतप्रधानपदी बसवावं. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास, शरद पवार पंतप्रधान होण्यास तयार असल्याचं मोठं विधान मेमन यांनी केलं आहे. देशाला एका अनुभवी नेत्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

=====================================================================================

VIDEO : प्रियांका गांधी भाजपवर भडकल्या, म्हणाल्या 'क्या बकवास है'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 07:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...