अहमदनगर, 4 जानेवारी : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या 22 खासदारांची माहिती मागविली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून कुणाला पुन्हा संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
अमित शहा यांनी लोकसभा स्वबळावर लढविण्याचे संकेत दिल्याच्या चर्चेनंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नगरमध्ये जाणार आहेत. त्यावेळी ते लोकसभेच्या तयारीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
शहांसोबतच्या बैठकीनंतर काय म्हणाले होते दानवे?
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक झाली. या बैठकीत भाजप-शिवसेना युतीवर चर्चा झाली का, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दानवे म्हणाले की, "युतीची चर्चा या बैठकीत होत नसते. एनडीएला सोबत घेऊन निवडणुका व्हाव्यात, असं आम्हाला वाटतं. मतांचं विभाजन टाळावं, विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये, अशी आमची भूमिका आहे."
महिनाभरात युतीचा निर्णय घ्या, भाजपचा शिवसेनेला अल्टीमेटम
लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त पाच महिने राहिले आहेत. तर आचारसंहिता दोन महिन्यात लागू होईल. त्यामुळं युतीबाबत महिन्याभरात निर्णय घ्या असा अल्टिमेटम भाजपने शिवसेनेला दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीसाठी भाजपने शिवसेनेला वारंवार आवाहन केलं मात्र सेनेकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे जास्त वाट पाहायची नाही असं भाजपने ठरवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
युतीबाबत शिवसेनेशी बोलणी करण्यास भाजप सकारात्मक आहे. विधानसभेत काही जास्त जागा देण्याची तयारीही भाजपने दाखवली आहे. जानेवारी महिन्यापर्यंतच वाट बघू नंतर स्वबळाची तयारी करू असं भाजपन ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि सेनेत कटुता निर्माण झाली होती.
सत्तेत सहभागी होऊनही सेनेचं वागणं हे कायम विरोधी पक्षासारखच आहे. भाजप, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीनंतरच त्यांनी स्वबळावर निवडणुक लढण्याची घोषणा केली होती.
VIDEO : सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेची ही आहे अवस्था