PM MODI LIVE: नोटबंदीची खरंच गरज होती का? मोदी म्हणतात...

PM MODI LIVE: नोटबंदीची खरंच गरज होती का? मोदी म्हणतात...

"एका लढाईने पाकिस्तानला धडा मिळणार नाही. पाकिस्तानला सुधारण्यासाठी खूप वेळ लागेल"

  • Share this:

 

नवी दिल्ली, 1 जानेवारी : नोटबंदीमुळे मोदी सरकारवर चौफेर टीका झाली. आज एनआयएला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीचे समर्थन केलं आहे. "नोटबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली." असा दावा त्यांनी केला.

एनआयए वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय का घेतला यावर पहिल्यांदाच सविस्तर खुलासा केला आहे.

"नोटबंदी होण्याआधी काळ्या पैशाला देशात पाय फुटले होते. घरात लोकांनी काळा पैसा लपवून ठेवला होता. काळ्या पैशाने देशाला पोखरून काढले होते. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घ्यावा लागला", असा खुलासा पंतप्रधान मोदींनी केला.

"देशात काळा पैशाबाबत नेहमी बातम्या येत होत्या, त्यामुळे देशात एक अर्थव्यवस्था आणणे गरजेचं होतं. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घेतला. येणाऱ्या काळात याचा मोठा फायदा होणार आहे. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर आला. टॅक्स देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रामाणिकपणावर लोकांचा विश्वास वाढला आहे.", असा दावा त्यांनी केली.

नोटबंदी हा झटका होता का? असा सवाल विचारला असता मोदी म्हणाले की, "नोटबंदी हा झटका नाही. नोटबंदीच्या वर्षभरापुर्वी लोकांना काळा पैसा जमा करण्याचे आवाहन केले होते. काळा पैसा जमा केल्यावर दंड कमी लागेल अशीही योजना काढली होती. संसद, प्रसारमाध्यमातून ही आम्ही आव्हान केलं होतं. पण तरीही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय असाच घेतला नाही."

ते पुढे म्हणाले, "काळा पैशाला परत आणावे लागणार आहे. कर्जबुडवे या आधी पळून गेलेले देशात परत येत नव्हते. पहिल्यांदाच अशा लोकांना परत आणण्याचे प्रयत्न होत आहेत"

उद्धव ठाकरेंच्या 'चौकीदार चोर है'ला मोदींचं हे प्रत्युत्तर

"2018 हे आमच्यासाठी चांगलं वर्ष ठरलं. निवडणुका हा राजकारणातला फक्त एक छोटा भाग आहे. पाच राज्यातील विधानसभेच्या पराभवाचं कारण आम्ही शोधतोय. त्याचं चिंतन करणार आणि सुधारणाही करणार आहोत", असं मोदी म्हणाले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढपूरच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या "चौकीदार चोर है" या वक्तव्यावरून मोदींवर टीका केली होती.

पंतप्रधान मोदी म्हणता की, "युतीतील पक्षांना वाटतं की, भाजपवर दबाव टाकून ते स्वतःचा फायदा करून घेऊ शकतात."

सर्जिकल स्ट्राईकची तारीख दोनदा बदलली होती

सर्जिकल स्ट्राईकची तारीख दोनदा बदलली होती. मला जास्त काळजी आपल्या जवानांच्या जीवाची होती, असं पंतप्रधान मोदी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

"सर्जिकल स्ट्राईक करणं ही मोठी जोखीम होती. पण मला राजकीय जोखमीची चिंता नसते. जवानांच्या जीवाची मला जास्त काळजी होती", असं पंतप्रधानांनी सांगितलं. मोदींना रात्रभऱ सर्जिकल स्ट्राईकचे LIVE अपडेट्स मिळत होते, अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. आपले जवान सीमेपलीकडे असताना एक तास काहीच अपडेट्स मिळत नव्हते, तेव्हा चलबिचल वाढली होती. असंही त्यांनी सांगितलं.

"एका लढाईने पाकिस्तानला धडा मिळणार नाही. पाकिस्तानला सुधारण्यासाठी खूप वेळ लागेल", असंही मोदी म्हणाले. ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी पंतप्रधानांची ही प्रदीर्घ मुलाखत घेतली.

जनता विरुद्ध महागठबंधन

2019 ची निवडणूक मोदी विरुद्ध कोण असेल असं विचारलं असता पंतप्रधान म्हणाले, "पुढची निवडणूक ही जनता विरूद्ध महागहठबंधन अशी असेल."

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. कारण गेल्या चाडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी मुलाखतीने केली आहे. 2019च्या निवडणुकीबद्दल काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे.

======================================

First published: January 1, 2019, 6:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading