पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची या देशात होणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची या देशात होणार भेट

पंतप्रधानपदाचा शपथविधी झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा पहिला परदेश दौरा कोणता असेल याबदद्ल माहिती कळलेली नाही पण 13 जूनला ते किरगिझस्तानला जाणार आहेत. तिथे ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचीही भेट घेणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मे : पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांची खूप चर्चा झाली. आता दुसऱ्या इनिंगमध्येही पुन्हा एकदा या दौऱ्यांचा सिलसिला सुरू होणार आहे.

मागच्या वेळी पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी पहिला भूतानचा दौरा केला होता. आता मोदींचा पहिला परदेश दौरा कोणता असेल याबदद्ल माहिती कळलेली नाही पण 13 जूनला ते किरगिझस्तानला जाणार आहेत. सुषमा स्वराज यांनी नुकताच किरगिझस्तानचा दौरा केला आहे.

इम्रान खान यांच्याशी चर्चा

मोदींच्या किरगिझस्तानच्या दौऱ्यात ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत भाग घेतील. ही बैठक 13 जूनला सुरू होणार आहे. याच बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेणार आहेत.

याआधी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांची भेट घेतली होती. त्यावेळी हे दोन्ही नेते औपचारिकरित्या भेटले पण दोघांची फारशी चर्चा झाली नाही.

शी जिनपिंग यांचीही भेट

किरगिझस्तानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इम्रान खान यांच्याशी चर्चा होईल, अशी माहिती आहे. याआधी इम्रान खान यांनी निवडणूक निकालानंतर ट्विटरवरून नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं होतं.

याच दौऱ्यात नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतील.

28 जून ला जपानला जाणार

किरगिझस्तानच्या दौऱ्यानंतर मोदी G-20 परिषदेत भाग घेण्यासाठी जपानमधल्या ओसाकाला जाणार आहेत. हे सगळे दौरे नक्की असले तरी मोदींचा पहिला परदेश दौरा अजून ठरलेला नाही. मोदी कोणत्यातरी शेजारी देशाचाच दौरा पहिल्यांदा करतील, अशी शक्यता आहे. याआधी पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदींनी 59 देशांचा दौरा केला होता.

=============================================================================

सुरतमध्ये अग्नितांडवात 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून टाकल्या उड्या LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 08:49 PM IST

ताज्या बातम्या