गुजरातमध्ये आज मोदींचा सभांचा 'षटकार', मुख्यमंत्री फडणवीस यांचीही 'बॅटिंग'

गुजरातमध्ये आज मोदींचा सभांचा 'षटकार', मुख्यमंत्री फडणवीस यांचीही 'बॅटिंग'

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुजरातमध्ये सभा घेणार आहेत.

  • Share this:

27 नोव्हेंबर : आज गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारतोफा जोरदार धडकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुजरातमध्ये सभा घेणार आहेत.

भूज, जसदान, चलाला, सुरत या चार ठिकाणी पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी एकूण सहा ठिकाणी सभा घेणार आहे.  तर मुख्यमंत्री फडणवीस तापी जिल्ह्यातल्या सोनगढ आणि व्यारा इथं सभा घेणार आहेत.

या दोन नेत्यांसह भाजपनं आपल्या नेत्यांची फौज गुजरातच्या निवडणुकीत उतरवली आहे. यात केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण, आरोग्यमंत्री जे पी नड्डा, कृषीमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर तसंच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा समावेश आहे.

मोदींचा गुजरात दौरा, कसा असणार कार्यक्रम?

- सकाळी 9 वा. - भूजमध्ये सभा

- सकाळी 11 वा. - राजकोट जिल्ह्यातल्या जासदानमध्ये सभा

- दुपारी 1 वा. - अमरेली जिल्ह्यातल्या चलालामध्ये सभा

- दुपारी 3 वा. - सुरतमधल्या कडोदरामध्ये सभा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading