खळबळजनक; जवानांकडून बेछूट गोळीबार; 6 जवानांचा मृत्यू तर...

खळबळजनक; जवानांकडून बेछूट गोळीबार; 6 जवानांचा मृत्यू तर...

जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नारायणपूर, 04 डिसेंबर: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील भारत तिबेट सीमा पोलीस दला (ITBP)तील एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात 6 जवानांचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोन जण जखमी झाला आहेत. बुधवारी कडेनार येते असलेल्या ITBPच्या कॅम्पमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला. ज्या जवानाने 6 जणांवर गोळीबार केला त्याचा देखील या घटनेत मृत्यू झाला आहे. जखमी जवानांना राजधानी रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ITBPचे आयजी पी.सुंदरराज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राज्याचे गृह मंत्री ताम्रध्वज साहू यांनी या घटनेचा तपशील मागवला आहे. संबंधित जवानाने गोळीबार का केला यासंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही. यामागे सुट्टीचे कारण असू शकत नाही. जवानांनी सुट्टी मागितल्यास त्याला ती दिली जाते. त्यामुळे सुट्टी हे कारण असू शकत नाही. वैयक्तीक वादातून हा घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुधवारी सकाळी कॅम्पमध्ये गोळीबार झाल्याचा आवाज झाला. जवान जेव्हा गोळीबार झालेल्या ठिकाणी केले तेव्हा त्यांना 4 जवानांचे मृतदेह दिले. यात ज्या जवानाने गोळीबार केला होता त्याचा देखील मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार जवानांमध्ये झालेल्या वादातून हा गोळीबार झाला. वाद टोकाला गेल्यानंतर एका जवानाने त्याच्याकडील बंदूकीतून गोळीबार सुरु केला. यात जे जवान मध्ये आले त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारात जखमी झालेल्या जवानांना रायपूर येथे दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

याआधी 19 जून 2019 रोजी छत्तीसगड आर्म फोर्समधील एका जवानाने आपल्या दोन सहकार्यांवर गोळीबार केला होता. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गोळीबार करणाऱ्या जवानाला अटक करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2019 11:56 AM IST

ताज्या बातम्या