बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी

बलात्कार प्रकरणात नारायण साई दोषी ठरला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 01:45 PM IST

बलात्कार प्रकरणात आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी

सुरत, 26 एप्रिल : आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला सुरत न्यायालयानं बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. सुरत सत्र न्यायालयानं नारायण साईला दोषी ठरवलं आहे. दरम्यान, आता शिक्षेची सुनावणी ही 30 एप्रिल रोजी होणार आहे. बलात्कार प्रकरणामध्ये नारायण साई तुरूंगात होता. डिसेंबर 2013मध्ये नारायण साईंनं बलात्कार केल्याची कबुली दिली होती. शिवाय, इतर 8 महिला अनुयायांशी संबंध असल्याचं देखील नारायण साईनं मान्य केलं होतं. जहांगीरपुरा आश्रमातील बलात्कार प्रकरणामध्ये न्यायालयानं नारायण साईला दोषी ठरवलं आहे.

अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान साई आपला बचावही करत होता. पीडित महिलेच्या नातेवाईकांच्या सहमतीने संबंध ठेवले असा बनावही साईने रचला होता. चौकशीत साईकडून 7 मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. तसंच त्याने 8 महिलांशी संबंध असल्याचंही कबूल केलं होतं. या आठ महिलांपैकी काही महिला या आश्रमातील होत्या तर काही बाहेरच्या होत्या. सुरतमध्ये दोन पीडित तरूणींनी साई विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 58 दिवस नारायण साई फरार होता. दरम्यान .आता साईला न्यायालय काय शिक्षा ठोठावणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.


VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...