राणेंनी हिंदीतून तर अनिल देसाईंनी मराठीतून घेतली खासदारकीची शपथ

राणेंनी हिंदीतून तर अनिल देसाईंनी मराठीतून घेतली खासदारकीची शपथ

शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी मराठीतून तर राणेंनी हिंदीतून शपथ घेतली.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 एप्रिल : : माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीच्या राजकारणात एंट्री केलीये. राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी पार पडला. शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी मराठीतून तर राणेंनी हिंदीतून शपथ घेतली.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे महाराष्ट्रातून नियुक्त करण्यात आलेल्या 6 राज्यसभा खासदारांना आज शपथ देण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे नेते के. मुरलीधरन, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भाजपकडून नियुक्ती करण्यात आली. नारायण राणे यांनी हिंदीतून शपथ घेतली.

तर शिवसेनेचे अनिल देसाई, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं वंदना चव्हाण यांना पुन्हा राज्यसभेसाठी संधी दिलीय. अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांनी मराठीबाणा राखत मराठीतून शपथ घेतली.

काँग्रेसनं  ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवलंय. कुमार केतकर यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.

राणे यांच्या राज्यसभेतल्या एंट्रीनं आता संजय राऊत, कुमार केतकर आणि नारायण राणे अशी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

First published: April 3, 2018, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading