नारायण दत्त तिवारी यांच्या मुलाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

नारायण दत्त तिवारी यांच्या मुलाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

काँग्रेसचे दिवंगत नेते नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल: काँग्रेसचे दिवंगत नेते नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. रोहितला दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्याचे निधन झाल्याचे स्पष्ट केले.

रोहितने गेल्याच वर्षी मध्य प्रदेशमधील अपूर्वा शुक्ला हिच्याशी विवाह केला होता. या दोघांचा विवाह दिल्लीत झाला होता. लग्नात अनेक राजकीय नेते देखील उपस्थित होते. लग्नानंतर दोघांनी मॅक्स रुग्णालयात जाऊन एन.डी. तिवारी यांची भेट घेतली होती. तेव्हा तिवारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रोहित जानेवारी 2017 भाजपचा सदस्य झाला होता.

एन.डी. तिवारी यांचे कौटुंबिक आयुष्यात अनेक वाद होते. तिवारी यांनी 1954मध्ये सुशीला यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर 14 मे 2014 रोजी त्यांनी वयाच्या 88व्या वर्षी उज्ज्वला यांच्याशी विवाह केला. रोहित शेखरने असा दावा केला होता की एन.डी.तिवारी त्याचे पिता आहेत. हे सिद्ध करण्यासाठी रोहितने 2008मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर कोर्टाच्या आदेशानंतर तिवारी यांना डीएनए चाचणी करावी लागली. प्रथम तिवारी यांनी डीएनए टेस्ट करण्यास नकार दिला होता. मात्र नंतर कोर्टाने आदेश दिल्यामुळे तिवारी यांनी हे मान्य केले की रोहित आपला मुलगा आहे. तसेच तिवारी यांनी शेखरला संपत्तीचा वारस देखील केले होते.

VIDEO :...तर काँग्रेस नेत्याला विमानाच्या राॅकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं - फडणवीस

First published: April 16, 2019, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading