नंदन नीलेकणी इन्फोसिसमध्ये परतणार?

नंदन नीलेकणी इन्फोसिसमध्ये परतणार?

नंदन निलेकणी आता कुठले पद भूषवणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. सीएनबीसी टी.व्ही 18च्या एका बातमीनुसार नंदन निलेकणीला कंपनीच्या सर्वोच्च पदापैकी एक पद दिलं जाऊ शकतं

  • Share this:

23 ऑगस्ट: इन्फोसिसचा सी.ई.ओ  विशाल सिक्काने काही दिवसांपूर्वी  राजीनामा  दिला. त्यानंतर आता पुढचा सीईओ कोण होणार याची बरीच चर्चा होती. अशातच  आता नंदन नीलेकणी इन्फोसिसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

नंदन नीलेकणी आता कुठले पद भूषवणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. सीएनबीसी टी.व्ही 18च्या एका बातमीनुसार नंदन नीलेकणीला कंपनीच्या सर्वोच्च पदापैकी एक पद दिलं जाऊ शकतं. नंदन नीलेकणी हे इन्फोसिसच्या फाउंडर्सपैकी एक आहेत. नारायण मूर्तींनी राजीनामा दिल्यानंतर 2002 पासून 2007 पर्यंत नंदन नीलेकणी इन्फोसिसचे सी.ई.ओही होते. नंदन नीलेकणी आणि नारायण मूर्ती सी.ई.ओ असताना इन्फोसिस अत्यंत स्थिर होती असं म्हटलं जातं. 2009 साली आधार योजनेचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी त्यांनी इन्फोसिस सोडली.

अजून तरी इन्फोसिसने या गोष्टीची औपचारिक घोषणा केलेली नाही.पण नंदन नीलेकणींचा इतिहास पाहता ते सी.ई.ओच्या पदासाठी योग्य असल्याची सध्या मार्केटमध्ये चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 02:20 PM IST

ताज्या बातम्या