'इन्फोसिस'ची धुरा पुन्हा एकदा नंदन निलेकणींकडे !

'इन्फोसिस'ची धुरा पुन्हा एकदा नंदन निलेकणींकडे !

इन्फोसिस टेक्नोलाॅजीने आपल्या कंपनीची धुरा पुन्हा एकदा नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवली आहे.

  • Share this:

24 आॅगस्ट : नेतृत्वहीन झालेल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाची साॅफ्टवेअर कंपनी इन्फोसिस टेक्नोलाॅजीने आपल्या कंपनीची धुरा पुन्हा एकदा नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवली आहे. नंदन निलेकणी यांची चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलीये. कंपनीचे सध्याचे चेअरमन आर. शेषसायी आणि को-चेअरमन रवी वेंकटेशन यांनी आप-आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

यासह मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा देणारे विशाल सिक्का, निर्देशक मंडळाचे सदस्य जेफऱी एस.लेहमन आणि जाॅन एचमेंडी यांनी तत्काळ राजीनामा दिला असून ते स्वीकारले गेले आहे.

'आधार' परियोजनेला घेऊन चर्चेत राहिलेले निलेकणी हे मार्च 2002 ते एप्रिल 2007 पर्यंत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआईडीएआई) चे प्रमुखपदही त्यांची निवड करण्यात आली होती.

मागील आठवड्यात इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी कंपनीच्या संस्थापक आणि प्रवक्त्यांसोबत संबंध ताणले गेले होते. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2017 11:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...