'नाणार'विरोधी आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा

'नाणार'विरोधी आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा

राहुल गांधी यांनी या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केल्याची माहिती अशोक वालाम यांनी न्यूज़ 18 लोकमतशी बोलताना दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली. आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली.

नाणार प्रकल्पबाधितांच्या शिष्ठमंडळाने राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. संध्याकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे, संजय निरुपम, हुसेन दलवाई, भाई जगताप यांच्यासह नानार प्रकल्प विरोधक समितीचे शिष्ठमंडळ उपस्थित होते.

या शिष्टमंडळात अशोक वालाम, रामचंद्र मडेकर,योगेश नाटेकर,सत्यजीत चव्हाण, राजेन्द्र पातरबेकर, डॉ. मंगेश सावंत, विक्रांत कर्णिक या 7 जनांचा समावेश होता. राहुल गांधी यांनी या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केल्याची माहिती अशोक वालाम यांनी न्यूज़ 18 लोकमतशी बोलताना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 09:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading