आज पटोले घेणार राहुल गांधींची भेट

आज पटोले घेणार राहुल गांधींची भेट

काही दिवसांपूर्वी पटोलेंनी भंडाऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.

  • Share this:

10 ऑक्टोबर: भाजपच्या खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बंडखोर भाजप खासदार नाना पटोले आज गुजरातमध्ये राहुल गांधींची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे ते राहुल गांधींसोबत सभेच्या व्यासपीठावरही दिसतील.

काही दिवसांपूर्वी पटोलेंनी भंडाऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. सरकारच्या कृषीधोरणाचा विरोध करत त्यांनी हा राजीनामा दिला होता. तसंच भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांच्या अकोल्यातील आंदोलनाला पाठिंबाही दिला होता.

त्यानंतर पटोले काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा आहे. त्यामुळेच, पटोले काँग्रेसमध्ये प्रवेश कधी करणार, याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राहुल गांधी कालपासून गुजरातमध्ये आहेत. नाना पटोले आज दिल्लीहून अहमदाबादला जातील. आणि तिथून राहुल गांधींच्या प्रचाराचं ठिकाण गाठतील. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर ते सध्या सडकून टीका करत आहेत. राजीनामा देण्याच्या आधीपासूनच ते सरकारी धोरणावर टीका करत होते. तसंच नागपूरमध्ये असताना त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 09:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading