काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत, राज्याच्या राजकारणाला मिळेल नवे वळण!

काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत, राज्याच्या राजकारणाला मिळेल नवे वळण!

तर दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी राज्यात उपमुख्यमंत्रिपद हे काँग्रेसला द्यावे असा सूर लगावला होता. परंतु,

  • Share this:

 

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी :  प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची निवड झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये (Congres) मोठे फेरबदलाचे वारे वाहत आहे. नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) दिल्ली दरबारी दाखल झाले असून मंत्रिमद मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. तसंच नितीन राऊत यांच्याकडेही नवीन जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली आहे. पटोले यांनी आपल्याला मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेस हायकमांडकडून राज्यात खांदेपालट केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा दिल्लीत पोहोचले आहे. त्यांनी सुद्धा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

नितीन राऊत यांच्याकडे असलेले ऊर्जा खाते हे नाना पटोले यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. जर ऊर्जा खाते नाना पटोले यांना देण्यात आले तर नितीन राऊत यांनी नवीन जबाबदारी दिली जाण्याची चिन्ह आहे. मध्यंतरीच्या काळात वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नितीन राऊत यांनी टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी राज्यात उपमुख्यमंत्रिपद हे काँग्रेसला द्यावे असा सूर लगावला होता. परंतु, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याला नकार दिला होता. मात्र,   राहुल गांधी यांनी सुद्धा राज्यात सत्तेत बरोबरीचे स्थान मिळावे अशी अगोदरपासूनच भूमिका मांडली आहे. आता सुद्धा त्यांनी समान वाटपासाठी बोलल्याचे कळत आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसच्या निर्णयामुळे मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांच्यासोबत नवी टीम

दरम्यान, नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर राज्यात काँग्रेस नेत्यांवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने राज्यात नेमले आहेत आणि 10 उपाध्यक्षपदाचे चेहरे दिले आहेत. विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवलं आहे. त्याऐवजी चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

अशी आहे काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी

प्रदेशाध्यक्ष - नाना पटोले

कार्यकारी अध्यक्ष

1. शिवाजीराव मोघे

2. बसवराज पाटील

3. मोहम्मद अरिफ नसीम खान

4. कुणाल रोहिदास पाटील

5. चंद्रकांत हांडोरे

6. प्रणिती सुशीलकुमार शिंदे

उपाध्यक्ष

1. शिरीष मधुकरराव चौधरी

2. रमेश बागवे

3. हुसेन दलवाई

4. मोहन जोशी

5. रणजित कांबळे

6. कैलास गोरंट्याल

7. बी. जी. नगराळे

8. शरद आहेर

9. एम. एम शेख

10. माणिक जगताप

नवीन विधानसभा अध्यक्ष कोण?

नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.

त्यामुळे संग्राम थोपटे यांना संधी देऊन पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यांची जमेची बाजू जरी असली तरी राष्ट्रवादी त्यांच्या नावाला अनुकूल राहील का याविषयी वेगवेगळे तर्क आहेत. तर दुसरे नाव हे सुरेश वारपूडकर यांचे समोर आले आहे. सुरेश वारपूडकर हे पाथरी मतदारसंघामधून निवडून आले आहेत. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. परभणीमधून 1998-99 मध्ये खासदार सुद्धा होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.

अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.

Published by: sachin Salve
First published: February 9, 2021, 1:55 PM IST

ताज्या बातम्या