News18 Lokmat

नमो टीव्हीवर निवडणूक आयोगाची बंदी नाही, फक्त अटी लादणार

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 10:47 PM IST

नमो टीव्हीवर निवडणूक आयोगाची बंदी नाही, फक्त अटी लादणार

नवी दिल्ली 11 एप्रिल : आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरून नमो टीव्हीवर बंदी घातली जाऊ शकते असं म्हटलं जात होतं. पण आता निवडणूक आयोग नमो टीव्हीवर बंदी घालणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्याबाबतचं पत्रही आयोग दिल्लीच्या निवडणूक आयुक्तांना पाठविणार आहे. फक्त या टीव्हीवर ज्या जाहीराती दाखविण्यात येतात त्या जाहीराती संबंधीत समितीकडून मंजूर करून घ्याव्या लागणार असल्याची अट आयोग घालणार आहे.

काय आहे नमो टीव्ही?

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती. नमो टीव्ही वर पंतप्रधान मोदींच्या सभा दाखवल्या जातात. त्याशिवाय भाजपचे आणखीही कार्यक्रम दाखवले जातात. नमो टीव्ही हे न्यूज चॅनल आहे, असं टाटा स्कायचं म्हणणं होतं. पण नंतर मात्र ही एक खास सेवा आहे, असं टाटा स्काय ने म्हटलं.

परवानगी नाही

या चॅनलसाठी कोणताही परवाना घेतलेला नाही, असा विरोधकांचा आरोप होता. एखाद्या चॅनलवरून फक्त एकाच पक्षाच्या बातम्या दाखवू शकत नाही, असा आक्षेप घेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

Loading...

याआधी, निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' या मोदींच्या बायोपिकवरही काही कट सूचविले होते. पीएम नरेंद्र मोदी, NTR Laxmi आणि Udyama Simham या तीन बायोपिकवर बंदी घालण्यात आली आहे. हे सिनेमे निवडणूक काळात रिलीज करता येणार नाहीत, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या या आदेशामुळे या तिन्ही सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासावर तयार करण्यात आलेल्या पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाला हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही सिनेमाला क्लिन चीट दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 10:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...