नवी दिल्ली, 10 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिलला शुक्रवारी मतदान होतं आहे. त्यामुळे मोदींच्या बायोपिकच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्याचप्रमाणे नमो टीव्हीचं प्रसारण बंद ठेवण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. निवडणुकीच्या काळात नमो टीव्हीचं प्रसारण करता येणार नाही, असं आयोगाने म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती. नमो टीव्ही वर पंतप्रधान मोदींच्या सभा दाखवल्या जातात. त्याशिवाय भाजपचे आणखीही कार्यक्रम दाखवले जातात. नमो टीव्ही हे न्यूज चॅनल आहे, असं टाटा स्कायचं म्हणणं होतं. पण नंतर मात्र ही एक खास सेवा आहे, असं टाटा स्काय ने म्हटलं.
या चॅनलसाठी कोणताही परवाना घेतलेला नाही, असा विरोधकांचा आरोप होता. एखाद्या चॅनलवरून फक्त एकाच पक्षाच्या बातम्या दाखवू शकत नाही, असा आक्षेप घेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर आता या चॅनलवर बंदी येणार आहे.
याआधी, निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' या मोदींच्या बायोपिकवर बंदी घातली आहे. पीएम नरेंद्र मोदी, NTR Laxmi आणि Udyama Simham या तीन बायोपिकवर बंदी घालण्यात आली आहे. हे सिनेमे निवडणूक काळात रिलीज करता येणार नाहीत, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या या आदेशामुळे या तिन्ही सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासावर तयार करण्यात आलेल्या पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाला हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही सिनेमाला क्लिन चीट दिली होती.
================================================================================================================================================================
VIDEO : भाजपच्या सभेत तुफान राडा, महाजनांसमोर माजी आमदाराला लाथाबुक्क्याने मारहाण