मराठी बातम्या /बातम्या /देश /गोष्ट गावाच्या नावाची! गावाचं नाव उच्चारायला वाटायची लाज, उडवली जायची थट्टा

गोष्ट गावाच्या नावाची! गावाचं नाव उच्चारायला वाटायची लाज, उडवली जायची थट्टा

शाळा, महाविद्यालयात या गावातील विद्यार्थी आपल्या गावाचं नाव भोसरी लिहिताना लाजायचे. आपल्या गावाचं नाव उघडपणे ते घेऊ शकत नव्हते.

शाळा, महाविद्यालयात या गावातील विद्यार्थी आपल्या गावाचं नाव भोसरी लिहिताना लाजायचे. आपल्या गावाचं नाव उघडपणे ते घेऊ शकत नव्हते.

शाळा, महाविद्यालयात या गावातील विद्यार्थी आपल्या गावाचं नाव भोसरी लिहिताना लाजायचे. आपल्या गावाचं नाव उघडपणे ते घेऊ शकत नव्हते.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

बांका, 04 फेब्रुवारी : भारतातल्या अनेक राज्यात गावांची, शहरांची नावे वाचली की हसू येतं. काही वेळा नावांचा अर्थही विचित्र निघतो. अशाच मजेशीर गावे, रेल्वे स्थानकं आणि त्यांच्याशी संबंधित माहिती तुम्हाला आम्ही देणार आहे. मजेशीर नावांशिवाय काही नावं अशीही आहेत ज्यांचा उच्चार करायची तिथल्या लोकांना लाज वाटते. देशातील अनेक भागात गावांची अशी नावे आहेत. कालांतराने ती बदलली गेली. त्यासाठी स्थानिकांनी आवाज उठवला आणि शासन दरबारी पाठपुरावा करत नवी ओळख मिळवली.

राजस्थान, हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड याशिवाय इतरही राज्यात अशी गावे आहेत. अद्यापही अशी काही गावे आहेत ज्यांची नावे सांगण्यास किंवा लिहिताना लोकांना लाज वाटते. झारखंडच्या देवघर जिल्ह्यात मोहनपूर विभागातल्या बाका पंचायतीत असंच एक गाव होतं. गेल्या दोन दशकात शाळा, महाविद्यालयात या गावातील विद्यार्थी आपल्या गावाचं नाव भोसरी लिहिताना लाजायचे. आपल्या गावाचं नाव उघडपणे ते घेऊ शकत नव्हते.

हेही वाचा : भारीच! वयाची तीन वर्षं पूर्ण करण्यापूर्वीच चिमुकल्याच्या नावावर तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स

गावाच्या नावावरून थट्टा केली जाईल अशी भीती सतत गावातील लोकांना असायची. तसंच अनेकदा खिल्लीही उडवली जायची. अखेर गावकऱ्यांनी याविरोधात आवाज उठवला आणि गावाचं नाव बदलण्यासाठी प्रयत्न केले. कित्येक दशकांपासून होत असलेली अडचण गावाचं नाव बदलल्यानं दूर झाली. तरुणांच्या पुढाकाराने आणि ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यानंतर अखेर गावाचं नाव बदलण्यात यश आलं.

बांका पंचायतीचे सरपंच रणजितकुमार यादव यांनी सर्व सरकारी कागदपत्रांवर असलेलं गावाचं नाव बदलण्यासाठी ग्राम परिषदेची बैठक बोलावली होती. या बैठकीत गावकऱ्यांनी गावाचे नाव भोसरी ऐवजी मसूरिया असं करण्यासाठी ठराव मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी सर्व सरकारी कार्यलयात आणि कागदपत्रांमध्ये गावाचं नाव मसूरिया असं नोंद झालं. आता महसूल विभागाच्या संकेतस्थळावरही गावाचं नाव भोसरी ऐवजी मसूरिया असं ओळखलं जातं.

First published:

Tags: Jharkhand