Elec-widget

अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं वडिलांनी 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह नेला खांद्यावरून

अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं वडिलांनी 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह नेला खांद्यावरून

बिहारमध्ये आरोग्य सेवेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचा मृतदेह नेण्यासाठी रूग्णालयानं Ambulance उपलब्ध करून दिली नाही.

  • Share this:

नालंदा, 25 जून : अनेक क्षेत्रात देश सध्या प्रगती करताना दिसत आहे. पण, आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व सुविधा आहेत का? कारण, बिहारमधील नालंदा जिल्ह्यात अ‍ॅम्ब्युलन्स नसल्यानं वडिलांना 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह रूग्णालयातून खांद्यावरून आणावा लागला. मृत मुलगा हा नालंदा जिल्ह्यातील परवलपूर येथील रहिवासी आहे. यापूर्वी देखील पत्नीचा मृतदेह सायकलवरून आणावा लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणाची दखल ही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय, सिव्हिल सर्जन परमानंद चौधरी यांनी यांच्याकडे देखील स्पष्टीकरण मागितलं आहे.

काय आहे प्रकरण

आठ वर्षाचा सागर हा सायकल चालवत होता. त्यावेळी अचानक चक्कर येऊन तो कोसळला. त्यानंतर नातेवाईकांनी त्वरीत त्याला रूग्णालयामध्ये हलवलं. पण, स्थानिक डॉक्टरांनी त्याला जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करा असा सल्ला दिला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी 8 वर्षाच्या सागरला मृत घोषित केलं. घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पण, मुलाचा मृतदेह नेण्याकरता रूग्णालय प्रशासनानं अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे मुलाचा मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ या अभागी बापावर आली. या प्रकारानंतर रूग्णालयाकडे अ‍ॅम्ब्युलन्स असून देखील न दिल्यानं रूग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.

PNB Scam : मेहुल चोक्सीचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

चौकशीचे आदेश

Loading...

जिल्हाधिकारी योगेंद्र सिंह यांनी या साऱ्या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी सिव्हिल सर्जन परमानंद चौधरी यांच्याकडे या साऱ्या प्रकरणाचं स्पष्टीकरण देखील मागितलं आहे. अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध असून देखील ती का देण्यात आली नाही? असा सवाल जिल्हाधिकारी योगेंद्र सिंह यांनी केला आहे.

VIDEO: भरचौकात हल्लेखोरांकडून युवकाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...